Cliven Matthew Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2025: यंदाच्या गोवा कार्निव्हलसाठी क्लिवेन मॅथ्यू फर्नांडिस यांची 'किंग मोमो' म्हणून निवड

King Momo Announced For Goa Carnival 2025: गोव्यात यंदा 28 फेब्रुवारीपासून कार्निव्हल फेस्टिव्हलची धूम पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी, कार्निव्हलसाठी किंग मेमो जाहीर करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Goa Carnival 2025 King Momo

पणजी: गोव्याच्या पारंपरिक आणि बहुप्रसिद्ध कार्निव्हल महोत्सवासाठी तयारी जोमाने सुरू झाली आहे. गोवा पर्यटन विभागाने क्लिव्हन मॅथ्यू फर्नांडिस यांची 'किंग मोमो' म्हणून निवड केली असून, ते यंदाच्या कार्निव्हल 2025 चे नेतृत्व करणार आहेत. "खा, प्या आणि मजा करा!" असा संदेश देत, ते चार दिवसांच्या या जल्लोषपूर्ण सोहळ्याला सुरुवात करतील.

'किंग मोमो' चे नेतृत्व

गोवा कार्निव्हल हा केवळ एक सण नाही, तर तो जीवनाचा जल्लोष आहे. फेब्रुवारी 28 ते मार्च 4 या काळात संपूर्ण गोवा विविध रंगांनी आणि संगीताने न्हाऊन निघणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या भव्य सोहळ्यात स्थानिक लोक, पर्यटक, आणि कलाकार एकत्र येऊन गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव घेतील. कार्निव्हल दरम्यान संगीत, नृत्य, आणि परेडचे आयोजन केले जाते. खास करुन ‘किंग मोमो’च्या नेतृत्वाखाली हा उत्सव एक अविस्मरणीय सोहळा बनतो.

आयोजन कुठे करण्यात आले?

दरम्यान, राजधानी पणजीसह मडगाव, वास्को आणि म्हापसा येथे कार्निव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. येथे होणाऱ्या कार्निव्हलसाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून बक्षीस तसेच इतर आयोजनाच्या खर्चासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा येथे होणाऱ्या कार्निव्हलसाठी पर्यटन खात्याकडून बक्षीस तसेच इतर आयोजनच्या खर्चासाठी 27,35,000 रुपये रक्कम देण्यात आली आहे. तर पर्वरीत होणाऱ्या कार्निव्हलसाठी 17, 35,000 आणि मोरजीमध्ये होणाऱ्या कार्निव्हलसाठी 14,25,000 रुपये देण्यात आले आहेत.

यंदाच्या कार्निव्हलचे आकर्षण

गोवा कार्निव्हलमध्ये मुख्य आकर्षण म्हणजे रंगीत परेड, पारंपरिक नृत्ये, लाइव्ह म्युझिक बँड्स, आणि सुशोभित फ्लोट्स! शहराच्या प्रत्येक रस्त्यावर जल्लोषाचा माहोल असतो. लोक रंगीबेरंगी वेशभूषा करून आनंद लुटतात. हा उत्सव प्रत्येकासाठी खुला आहे. पर्यटक आणि स्थानिक रहिवासी दोघांनीही यात सहभागी व्हावे आणि गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचा आनंद घ्यावा असे आवाहन पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे.

गोव्यातील कार्निव्हलच्या तारखा: ( Goa Carnival Dates)

28 फेब्रुवारीपासून पर्वरीतून कार्निव्हलला सुरुवात होणार आहे.

पणजी- 1 मार्च

मडगाव- 2 मार्च

वास्को- 3 मार्च

म्हापसा आणि मोरजी- 4 मार्च

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT