Goa Carnival 2024: वास्कोत कार्निव्हल फ्लोट, परेडची धूम; थीममधून पर्यटन, परंपरेचा सन्मान करण्यावर भर

Goa Carnival 2024: वास्कोतील कार्निव्हल मिरवणूकमध्ये सांस्कृतिक वैभवाची झलक
Goa Carnival 2024
Goa Carnival 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Carnival 2024: खा, प्या आणि आनंदी राहा, या किंग मोमोच्या संदेशाने वास्को शहरात आज सोमवारी मोठ्या दिमाखात व्हिवा कार्निव्हल फ्लोट परेड झाली. रंगीबेरंगी आणि आकर्षित असे 60 चित्ररथांची मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

या वर्षीच्या कार्निव्हल थीममध्ये पर्यटन परंपरा आणि वारशाचा सन्मान करण्यावर भर देण्यात आला.

मिरवणूक सेंट अॅण्डू चर्च मार्गाने सुरू होऊन स्वतंत्र पथ मार्गाने मार्गक्रमण झाल्यानंतर रेल्वे स्थानकासमोर जोशी चौकात सांगता झाली. उत्सवात सहभागी होण्यासाठी स्थानिक लोक आणि पर्यटकांनी गर्दी केली होती.

वास्कोत कार्निव्हल मिरवणूक सेंट अॅण्डू चर्च ते स्वतंत्र पथ या मार्गावरून काढण्यात आली. या चित्ररथ मिरवणुकीत सुरुवातीला नौदलाचा चित्ररथ सहभागी झाला होता.

यावेळी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मूरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगराध्यक्ष गिरीष बोरकर, कार्निव्हल समिती अध्यक्ष फ्रान्सिस्को यासह फियोला रेगो, आर्नोल्ड रेगो व इतर वास्को कार्निव्हल उत्सव समिती पदाधिकारी उपस्थित होते.

Goa Carnival 2024
Filming In Goa: गोव्यात चित्रीकरणाच्या नियमात होणार मोठा बदल, उल्लंघन केल्यास भरावा लागणार हजारोंचा दंड

गोव्यात कार्निव्हल उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पर्यटन खात्याकडून पणजीनंतर, मडगावात व आज वास्कोत कार्निव्हलचे आयोजन केले होते.

गोव्याच्या श्रीमंतांचे प्रदर्शन, सांस्कृतिक वारसा जपताना उत्साही फ्लोट्स, संगीत आणि नृत्य सादरीकरणाने वास्को शहर जिवंत झाले.

या वर्षीच्या कार्निव्हलची थीम गोवा पर्यटनाच्या पुनर्जन्मात्मक पर्यटन दृष्टिकोनाशी संरेखित करून गोव्याच्या परंपरा आणि वारशाचा सन्मान करण्यावर केंद्रित आहे.

संक्रामक संगीत आणि चैतन्यमय वातावरणाने कायमची छाप सोडली, विशेषत: तरुणांवर, जे उत्सवाचा पुरेपूर आनंद लुटताना दिसले.

Goa Carnival 2024
Akhil Bhartiya Gandharva Mahavidyalaya: आनंद निकेतनच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे संवादिनी व तबला वादन परीक्षेत अलौकिक यश...

समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, कार्निव्हल हा गोव्याचा उत्सव आहे. गोव्यातील लोक कार्निव्हल मध्ये सहभागी होत आनंद लुटतात. हा कार्निव्हल शांततेत व विविध कार्यक्रमांनी साजरा व्हावा.

राज्यातील युवक हे जबाबदारीने वागणारे आहेत. त्यांनी पुढे ही परंपरा कायम ठेवली पाहिजे, असे आवाहनही केले. दरम्यान कार्निव्हलच्या चित्ररथ मिरवणुकीत गोवा पर्यटन विभागाचा चित्ररथ, नौदलाचा चित्ररथ, गोवा पोलिस, आरोग्य विभागाचा चित्ररथाने सहभाग दर्शवला.

रेबिजमुक्त गोवा, जीसुडाचा कचरा व्यवस्थापन दर्शवणारा, पंचायत संचालनालयाचा बायोगॅसची माहिती देणारा, ड्रंक अँड ड्राईव्ह, पर्यावरणाचे रक्षण व इतर संदेश देणारे चित्ररथ मिरवणुकीत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com