Bicholim market Dainik Gomantak
गोवा

Bicholim: तहान-भूक विसरुन डिचोली पालिका कामगारांची 'स्वच्छता' मोहीम

Bicholim Market: सर्वत्र चतुर्थीचा उत्साह संचारला असताना, डिचोलीत मात्र पालिकेचे सफाई कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत

दैनिक गोमन्तक

Bicholim Market: एकाबाजूने सर्वत्र चतुर्थीचा उत्साह संचारला असताना, डिचोलीत मात्र पालिकेचे सफाई कामगार चतुर्थीची उमेद पोटात ठेवून आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे.

या कामगारांकडून सध्या साफसफाईचे काम जोरात सुरू आहे. जेसीबी यंत्राच्या सहकार्याने चतुर्थीच्या पूर्व रात्रीपासून ही विशेष स्वच्छता मोहीम सुरू असून, गेल्या तीन दिवसात दहाहून अधिक ट्रक कचऱ्याची उचल करण्यात आली आहे.

चतुर्थीच्या बाजारातील माटोळीचे टाकाऊ सामान मिळून बाजारात प्रचंड प्रमाणात कचरा साचला असून, हा कचरा हटवण्याच्या कामात सध्या कामगार व्यस्त आहे.

कचरा बाजारात तसाच राहिल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे कचऱ्याची वेळीच उचल व्हावी, यासाठी चतुर्थीचा आनंद विसरून स्वच्छता कामाला प्राधान्य देण्यात आले आहे, असे सफाई कामगारांचे म्हणणे आहे.

* सुनील पळ, पर्यवेक्षक, डिचोली पालिका-

यंदा माटोळीचे सामान महाग होते. माटोळीच्या सामानाचा खप घटला होता. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात हे सामान शिल्लक राहिले. विक्रेत्यांनी दराच्या बाबतीत तडजोड केली असती, तर माटोळीचे सामान मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले नसते. पुढच्या वर्षी तरी विक्रेत्यांनी गणेशभक्तांना परवडेल अशा दराने सामानाची विक्री करावी. जेणेकरून कचऱ्यावर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.

''कोविड''मुळे दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा डिचोलीत मोठ्या प्रमाणात माटोळीचा बाजार भरला होता. यंदा माटोळीचे सामान महागल्याने खरेदी घटली होती. परिणामी विक्रेत्यांनी शिल्लक राहिलेले माटोळीचे सामान बाजारात अस्ताव्यस्त टाकून दिले आहे. त्यामुळे बाजारात टाकाऊ भाजीपाल्यासह माटोळीचा कचरा साचला आहे. विविध ठिकाणी कचऱ्याच्या राशी झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. पालिकेच्या सफाई कामगारांकडून सध्या कचरा हटविण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जवळपास 60 टक्के कचरा हटविण्यास कामगारांना यश आले आहे. बाजारात साचलेला संपूर्ण कचरा उचलण्यास आणखी किमान दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT