कोलवाळ: कोलवाळ येथे सावंत सरकारमधील मंत्री नीलकंठ हळर्णकर आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब आपल्या समर्थकांसह आमने-सामने आले. कोलवाळ येथे मंत्री हर्ळणकर यांनी जीएसटी बचत उत्सवानिमित्त रॅल काढली. या रॅलीदरम्यान परब घोषणा देत त्यांच्यासमोर आले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत परब यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्सकडून हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर हॅंडलवर पोस्ट केला.या व्हिडिओत मंत्री नीलकंठ हळर्णकर मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर धावून जातानाही दिसत आहेत.
मंत्री नीलकंठ हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली कोलवाळमध्ये 'जीएसटी बचत उत्सव' निमित्ताने एका रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली सुरु असताना अचानक आरजी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब (Manoj Pajrab) आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्र्यांच्या रॅलीसमोर आले. आरजी समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
परब आपल्या कार्यकर्त्यांसोबत घोषणाबाजी करत मंत्र्यांच्या रॅलीदरम्यान आल्यानंतर तणाव वाढला. मात्र परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परब यांच्यासह कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेमुळे कोलवाळसह संपूर्ण गोव्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजप (BJP) आणि आरजी यांच्यातील हा संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.