Sameer Panditrao
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, दिगदर्शक मनोजकुमार यांचे आज निधन झाले.
मनोजकुमार यांच्या सल्ल्यामुळे डॉन चित्रपटाला खूप फायदा झाला होता, काय आहे हा किस्सा? आपण माहिती घेऊ.
अमिताभ बच्चन, झीनत अमान आणि प्राण अभिनित डॉन हा सिनेमा चंद्रा बारोत यांनी दिग्दर्शित केला होता होता.
यातील किशीर कुमार यांच्या आवाजातले खैके पान बनारसवाला हे गाणे खूप गाजले होते, आजही ते प्रसिद्ध आहे.
दिग्दर्शक चंद्रा बारोत यांनी डॉन सिनेमा प्रदर्शनापूर्वी मनोजकुमार यांना दाखवला.
त्यातल्या एका पोलीस सिक्वेन्सनंतर मनोजकुमार म्हणाले की इथे प्रेक्षकांना जरा टेन्शनमधून बाहेर काढा, काहीतरी वेगळे करा असा सल्ला त्यांनी दिला.
त्यांनतर देव आनंदच्या बनारसी बाबू सिनेमातुन काढले गेलेले खैके पान बनारसवाला गाणे तिथे वापरले गेले आणि ते गाणे लोकप्रिय झाले