Claiming that mineral transport of Vedanta running through Pilgao Sarmanas is illegal the villagers demanded to stop the mineral transport  Dainik Gomantak
गोवा

खनिज वाहतुकीवरुन पिळगावची ग्रामसभा तापली; बेकायदा वाहतूक बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

खनिज वाहतुकीच्या मुद्यावरुन पिळगाव पंचायतीची आजची ग्रामसभा काहीसी तापली.

Manish Jadhav

खनिज वाहतुकीच्या मुद्यावरुन पिळगाव पंचायतीची आजची ग्रामसभा काहीसी तापली. पिळगाव-सारमानसमार्गे चालू असलेली 'वेदांता'ची खनिज वाहतूक बेकायदेशीर असल्याचा दावा ग्रामस्थांनी ग्रामसभेत करुन सध्या चालू असलेली खनिज वाहतूक बंद करा, अशी मागणी केली.

पिळगाव पंचायतीची ग्रामसभा आज (रविवारी) सरपंच सौ. मोहिनी जल्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेस उपसरपंच सुनील वायंगणकर यांच्यासह उमाकांत परबगावकर, सौ. सोनिया बेतकीकर, चेतन खोडगिणकर, सौ. शर्मिला वालावलकर आणि स्वप्नील फडते हे सर्व पंचसदस्य उपस्थित होते.

सरपंच सौ. जल्मी यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. सकाळी 10.30 वा. सुरु झालेली ही ग्रामसभा दुपारी साधारण पावणे एक वाजता आटोपली. या ग्रामसभेत रस्त्याच्या बाजूने वाढलेली झूडुपे आदी गावातील समस्यांवर चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT