mobile tower Dainik Gomantak
गोवा

शंकरवाडी येथील मोबाईल टॉवरचा वाद पेटला; सरपंचांवर प्रश्‍नांचा भडिमार

ग्रामसभेत ग्रामस्‍थांनी केला तीव्र विरोध

दैनिक गोमन्तक

पणजी: शंकरवाडी येथील मोबाईल टॉवरचा विषय ताळगावच्‍या ग्रामसभेत आज बराच गाजला. ग्रामस्‍थांचा या टॉवरला तीव्र विरोध आहे. ॲड. भुपेश फळदेसाई आणि ॲड. पुंडलिक रायकर यांनी पंचायत क्षेत्रात मोबाईल टॉवर नकोच, असा ठराव घेण्याचा आग्रह धरला. मात्र सरपंच जानू रुझारियो यांनी ‘या मोबाईल टॉवरला पंचायतीने मान्‍यता दिलेली नाही. त्‍यामुळे या प्रकरणात पंचायतीचा काहीही संबंध नाही. परिणामी ठराव घेण्याची गरज नाही’ असे सांगितले. यावरून ग्रामसभेत गदारोळ माजला. ‘आप’च्‍या नेत्‍या सीसिल रॉड्रिगी‍स व फ्रान्‍सिस कुयेल्लो यांनी सरपंचांना धारेवर धरले. (Citizens oppose mobile tower at Shankarwadi )

यावेळी उपसरपंच रेगा पै, पंच संतोष चोपडेकर, आग्‍नेल डिकुन्‍हा, मारिया फर्नांडिस, सिडनी बार्रेटो, महादेव कुंकळकर, रघुनाथ कुंकळकर, सरस्‍वती मुरगावकर, पंचायत सचिव रोहिदास परेरा आणि ग्रामस्‍थ मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

स्‍थानिकांना मोबाईल टॉवर नको आहे. तसेच या टॉवरमुळे आरोग्‍याच्‍या समस्या निर्माण होऊ शकतात, असे ॲड. रायकर यांनी सांगितले. तर, केंद्र सरकारच्‍या नवीन धोरणानुसार मोबाईल टॉवरला परवाना देण्याचा अधिकार पंचायतीला नाही. यामुळे याच्‍याशी पंचायतीचा काहीच संबंध नाही, अशी भूमिका सरपंचांनी मांडली. आम्‍ही स्‍थानिकांसोबतच आहोत. टॉवरला विरोध असल्‍याने पंचायतीने संबंधित खात्‍यांकडे पत्रव्‍यवहार केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्‍याकडून अहवाल आल्‍यावर पुढील कार्यवाही करून टॉवरला विरोध असल्‍याचा ठराव घेऊ, असे आश्‍वासन सरपंचांनी दिल्‍यानंतर आक्रमक झालेले ग्रामस्‍थ शांत झाले. तसेच अहवाल येईपर्यंत टॉवरचे काम थांबवले जाईल, असेही आश्‍वासन सरपंचांनी दिले.

चार दिवसांपूर्वी ग्रामस्‍थ एकवटले होते

ग्रामसभा सकाळी 10.30 वाजता सुरू होताच मोबाईल टॉवरचा विषय चर्चेला आला. या टॉवरला चार-पाच दिवसांपूर्वी ग्रामस्‍थांनी शंकरवाडी-ताळगाव येथे एकत्र येऊन तीव्र विरोध केला होता. तसेच काम करणाऱ्या कंत्राटदारास फैलावर घेतले होते. आजच्‍या ग्रामसभेत हा विषय येणार हे अपेक्षित होते, आणि त्‍यानुसार तो चर्चेला आला. यावेळी संतप्‍त झालेल्‍या ग्रामस्‍थांनी सरपंचांवर प्रश्‍‍नांचा भडिमार करून त्‍यांना फैलावर धरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

SCROLL FOR NEXT