पर्वरी मतदार संघातील सुकुर पंचायतीची निवडणूक वेळेत न घेतल्याप्रकरणी संदीप वझरकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी गोवा राज्य निवडणूक आयोगाने बाजू मांडताना याचिकादाराला पाठिंबा देत ही निवडणूक वेळेत घेण्याची गरज होती व घटनेनुसार ती घ्यायला हवी होती असे मत नोंदवले.या वेळी बाजु मांडताना राज्य सरकारने निवडणूक तारखेची अधिसूचना न काढल्याने ही निवडणूक घेणे शक्य झाले नाही असे स्पष्ट केले. (Sukkur Panchayat elections must be held on time - Mumbai High Court )
राज्य सरकारनेही पंचायत निवडणूक घेण्यासाठी गेल्या चार जूनला तयारी केली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण अधिसूचना काढली नसल्याने निवडणुकीची अधिसूचना काढणे शक्य झाले नाही. तसेच सध्या पावसाळा असल्याने व हे मतदान मतपत्रिकेद्वारे घेण्यात येणार असल्याने त्यावरील शाईवर पाण्याचा थेंब पडल्यास अडचण निर्माण होऊ शकते अशी संभावना होती.
त्यामुळे येत्या सप्टेंबर पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल तसेच ओबीसी आरक्षण सर्वे ही पूर्ण केला जाईल अशी बाजू सरकारतर्फे अडव्होकेट जनरल यांनी मांडली.दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या याचिकेवरील निर्णय राखीव ठेवला आहे.
विजय यांच्या या ‘संडे डायलॉग’ना आता भाजपकडून काही उत्तर असेल का ?
विजय सरदेसाईंचे ‘डायलॉग’
आपल्या मतदारसंघातील मतदारांबरोबर सतत संपर्क ठेवणारे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल रविवारपासून पुन्हा एकदा आपला ‘संडे डायलॉग’ हा संवादाचा उपक्रम सुरू केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयात बोलावून लोकांच्या समस्या तिथल्या तिथे सोडविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जातो.
विजयच्या मागच्या कार्यकाळात त्यांना याच उपक्रमाने मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यावेळी विजय सत्ताधारी गटात होते. मात्र, यावेळी ते विरोधी गटात असल्याने सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळणार की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. पण कालच्या त्यांच्या या उपक्रमाला सरकारी अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी उपस्थिती लावली. त्यामुळे विजय यांचे सरकारी अधिकाऱ्यांबरोबरही ‘डायलॉग’ चांगले आहेत हे सिद्ध झाले. विजय यांच्या या ‘संडे डायलॉग’ना आता भाजपकडून काही उत्तर असेल का ?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.