Citizens of Zuarinagar angry over water bill  Dainik Gomantak
गोवा

झुआरीनगरचे नागरिक पाणी बिलावरून संतप्त

नागरिकांची अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

झुआरीनगर येथील प्रभाग नऊमधील काही रहिवाशांना पाणी बिले मोठ्या रकमेची आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'रोजंदारीवर काम करणारे आम्ही, एवढी मोठ्या रकमेच्या बिलांसाठी पैसे कोठून आणणार, असा सवाल त्या रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी (Officer) वर्गाची भेट घेऊन हा प्रश्न उपस्थित करण्याचा मनोदय झुआरीनगरच्या रहिवाशांनी व्यक्त केला आहे.

या भागात अनियमित पाणी पुरवठा होतो, या कारणासाठी गेल्या महिन्यामध्ये या वस्तीतील तसेच आसपासचे रहिवाशी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पाणी (water) पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते.

पाणी पुरवठा योग्यरीत्या झाला नसतानाही रहिवाशांना हजारो रुपयांची पाणी बिले आली आहेत. गेल्या सहा महिन्यांची बिले एकदम देण्यात आली आहेत. काहीजणांना दहा हजार रुपयांपर्यंत पाणी बिले आली आहेत.

या भागातील काही रहिवाशांच्याघरांमध्ये तीन माणसे राहत असतानाही त्यांना हजारो रुपयांची बिलं आल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पूर्वी अतिशय कमी पाणी बिल येत होते. एवढ्या मोठ्या रकमेची बिले कधीच आली नसल्याचे रहिवाशी सांगत आहेत.

नागरिकांची अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

सरकारने सोळा हजार लिटरपर्यंत पाणी बिल माफ केले असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये बिल न आल्याने आम्हाला वाटले की, आम्हाला मोफत पाणी मिळत आहे. परंतु, आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचे रहिवाशांनी सांगितले. आम्ही रोजंदारीवर जगणारी माणसे आहोत, त्यामुळे एवढी मोठी रक्कम भरण्यासाठी आम्हाला कर्ज घ्यावे लागणार असल्याचे काहीजणांनी सांगितले.

या बिलांसंबंधी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी वर्गाने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रहिवाशांनी आपली कैफियत स्थानिक पंच सदस्य गणेश लमाणी व आरिफ कादर यांच्या कानावर घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT