पणजी: पक्षांतर केलेल्या आमदारांनी (MLA) जनतेची कामे केली नाहीत. त्यांनी स्वत:ची कामे केली. पैसा आणि पद यासाठी त्यांनी पक्षांतर केले, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM) तथा आम आदमी (AAP) पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Aravind Kejariwal) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. (Citizens of Goa should see development of Delhi)
ते म्हणाले, की पक्षांतर केलेले आमदार कामे होण्यासाठी सत्ताधारी (Goa Politics) पक्षात गेल्याचे सांगतात. ती कामे कोणाची हे जनतेनेच तपासावे. जनतेची कामे झाली की आमदारांची कामे झाली हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. जनता हे सगळे जाणून आहे. सत्ता, पैसा यासाठी आमदारांनी पक्षांतर केले हेही लपून राहिलेले नाही. कोणत्याही पक्षातून निवडून येऊन भाजपमध्येच जायचे आहे तर मग गोव्यात निवडमूक का घेता. निवडणुकीचा फार्स कशासाठी. पैसे घ्या व सरकार स्थापन करा. जनता या साऱ्याला विटली आहे. ती स्वच्छ राजकारणासाठी पर्यायाच्या शोधात होती. तो पर्याय ‘आप’च्या रूपाने मिळाला आहे. राजकारण स्वच्छ करण्याची म्हणूनच हजारोजण दिवसेंगणिक प्रतिज्ञा करत आहेत.
गेल्या निवडणुकीत भाजपला 13 जागा मिळाल्या. आज त्यांच्याकडे 28 आमदार आहेत. कॉंग्रेसला 17 जागा मिळाल्या आणि आज 5 आमदार शिल्लक आहेत. कॉंग्रेसचे सरकार यावे यासाठी मतदान केलेल्या जनतेची ही फसवणूक आहे, असे नमूद करून ते म्हणाले, कोविड महामारीच्या काळात ‘आप’चे स्वयंसेवक मदतीला धावले. कोणी ऑक्सिमीटर मोहिमेतून जनतेची सेवा केली, कोणी रेशन पोचवण्यात वाटा उचलला, वैद्यकीय मदत पुरवली, हेल्पलाईन चालवली. यामुळे जनतेला सत्तेत नसतानाही कोणता पक्ष जनसेवा करतो याची माहिती झाली आहे.
दिल्लीत प्रत्येक भागात सरकारी दवाखाने सुरू केले. मोफत औषधोपचार केला. सरकारी शाळांत सुविधांची वाढ केली, नव्या इमारती बांधल्या. हे सारे गोमंतकीय जनतेने दिल्लीत पहावे. आम्ही जे सांगतो ते करतो. आमची आश्वासने निवडणुकीपुरती नसतात याची खात्री जनतेने गोमंतकीय बाळगावी असेही त्यांनी नमूद केले. यावेळी राज्य संयोजक राहुल म्हांबरे, सहसंयोजक ॲड. प्रतिमा कुतिन्हो, सुरेल तिळवे आदी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.