High fuel prices: "मोदी सरकार हेच देशावरील मोठे संकट"

केंद्र सरकार कोरोना महामारीतील गैरव्यवस्‍थापनामुळे बदनाम झाले. आणि आता पेट्रोल, डिझेल (fuel prices) व गॅसची दरवाढ करून जनतेवर अन्याय करत आहे.
High fuel prices: Modi Government
High fuel prices: Modi GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकार कोरोना (Covid-19) महामारीतील गैरव्यवस्‍थापनामुळे बदनाम झालेले असतानाच वारंवार पेट्रोल, डिझेल व गॅसची (fuel prices) दरवाढ करून सर्वसामान्य जनतेवर ते अन्यायही करत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली सर्व आश्‍वासने विसरून लोकांवर दरवाढीच्या माध्यमातून केंद्र सरकार अत्याचार करत असून मोदी सरकार (Modi Government) हेच आता देशावरील मोठे संकट ठरले आहे, अशी टीका कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मुहंम्मद यांनी काल बुधवारी केली. पणजी येथील कॉंग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रवक्ते तथा माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. (Modi government is biggest crisis in country; Congress)

High fuel prices: Modi Government
Goa: लोबो पती-पत्नीचे शिवोलीत स्वागतच : विनोद पालयेंकर

देशात 23 कोटी लोक आजही गरीब आहेत. बेरोजगारी दर 8.1 टक्के झाला आहे. गेल्या 7 वर्षांत जीवनावश्‍यक वस्तूंचे तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढले. विविध क्षेत्रांत भ्रष्टाचार करून केंद्र सरकारने गरिबांच्या पोटावर पाय दिला. कोरोना काळात 2 कोटी लोकांना नोकरी गमवावी लागली. 65 वेळा इंधनाचे दर वाढवले. फक्त आश्‍वासने देणे सुरू आहे. कोरोना काळातील गैरव्यवस्थापनामुळे हजारो लोकांना प्राण गममावे लागले, असे आरोप डॉ. मुहंम्मद यांनी केले. केंद्र सरकारने नवी संसद इमारत बांधण्यापेक्षा कोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना, बेरोजगार झालेल्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

High fuel prices: Modi Government
Goa Politics: मगो पक्षाशी युतीबाबत केजरीवालांचे सूचक मौन

युपीएच्या काळात पेट्रोल व डिझेलवर अनुक्रमे 9.4 रु. व 3.46 रु.एक्साईज ड्युटी होती, ती आता अनुक्रमे 33 रुपये व 32 रुपये केली. कॉंग्रेसच्या काळात क्रुड तेलाचे दर144 डॉलर प्रती बॅरल असताना 71 रुपये लीटर पेट्रोल होते. आता ७६ रुपये प्रती बॅरल दर असताना पेट्रोल १०० रुपये केले. युपीए काळात सिलींडर 414 रुपये होता आता तो 850 रुपये केला. केंद्र सरकार देशाला लुटत असल्याचा आरोप डॉ. मुहंम्मद यांनी केला.

कॉंग्रेसच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद - गिरीश चोडणकर

महागाईच्या विरोधात गोवा प्रदेश कॉंग्रेसने विविध ठिकाणी आयोजित केलेल्या मोर्चांना व सायकल रॅलींना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरून इंधन दरवाढीच्या विरोधात गोवेकर असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे प्रतिपादन गिरीश चोडणकर यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com