Panaji Rain Dainik Gomantak
गोवा

Panaji Rain: गुळगुळीत रस्‍ते नंतर बघू; किमान खड्डे तरी बुजवा

लोकांचा संताप अनावर : पणजीतील रस्‍त्‍यांवरून चालणेही बनले कठीण

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : पणजी ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत शहर परिसरातील विविध रस्‍त्‍यांचे काम करण्‍यात आले. परंतु सिटी स्मार्ट करण्याचा या प्रयत्नाने उन्हाळ्याभर पणजीवासीयांना तसेच पणजीत येणाऱ्या प्रत्येकाला धूळ खावी लागली.

आता बहुतांशी रस्त्यांना खड्डे पडल्याने सर्वसामान्य नागरिकांना वाहने सोडाच, पायी चालणे देखील कठीण बनले आहे.

पणजी महानगरपालिकने आता गुळगुळीत रस्‍ते नकोच किमान रस्त्यांवरील खड्डे तरी बुजवून ते पायी चालण्यायोग्य बनवावेत, अशी मागणी पणजीवासीय करत आहेत.

पणजी शहरातील सांतिनेज परिसर, टोंक आणि बहुतांशी सर्व भागातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहनचालकांना तसेच पदचाऱ्यांना अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात.

खड्डे बुजविण्यासाठी दगड, चिऱ्याचे तुकडे आणून ठेवले आहेत. परंतु ते बुजविण्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

खड्डे भरले ; बसथांबे छपराविना

नागरिकांना सुरळीतपणे प्रवास करता यावा या हेतूने पणजी शहरात विविध ठिकाणी बसथांबे उभारले आहेत. पंरतु या बसथांब्यांचे काम अर्धवट आहे. छपराविना बसथांब्याचा वापर कसा करावा, असा प्रश्‍न उपस्थित करण्‍यात येत आहे.

तसेच काकुलो मॉल शेजारील रस्त्याची स्‍थिती अतिशय बिकट झाली असून लोकांना चालणे देखील कठीण होत आहे.

काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले, परंतु पावसामुळे त्‍यावरील सिमेंट वाहून गेले व पुन्हा खड्ड्यांची अवस्था ‘जैसे थे’ झालेली आहे. नियोजनाचा अभाव त्‍यास कारणीभूत आहे, असे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: प्रेम व्यक्त करण्यासाठी 'योग्य' दिवस! वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी 'या' वेळी प्रपोज केल्यास होणार फायदा

Missing Womens: 2 ज्येष्ठ महिला अचानक बेपत्ता! मये भागात खळबळ; संशयास्पद ठिकाणी शोधमोहीम सुरु

Bicholim: ..अचानक बँकेचा 'सायरन' वाजू लागला! पोलीस, अग्निशमनची उडाली धावपळ; कारण बघून जीव पडला भांड्यात

Shri Saptakoteshwar: शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या ‘सप्तकोटीश्वर’चा इतिहास उलगडणार, पर्यटन खात्याकडून चित्रपटाची निर्मिती

Goa Shack Policy: शॅक्सच्या ‘सबलेटिंग’ प्रकरणांचा पुनर्विचार होणार! मंत्री खंवटेंनी दिली माहिती; 23 परवान्यांचे होणार नूतनीकरण

SCROLL FOR NEXT