Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: चर्चिल सर्वांत भ्रष्ट राजकारणी- फ्रान्‍सिस सार्दिन

सार्दिन यांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News आलेमाव हे गोव्यातील सर्वात भ्रष्ट राजकारणी. त्यामुळेच दोनवेळा त्यांना तुरूंगात जावे लागले होते, असा आरोप दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केला.

‘दोनवेळा तुरुंगवासाची हवा खावी लागलेले गोव्यातील एकमेव मुख्यमंत्री’ हा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर नोंद झालेला आहे, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढविला.

चर्चिल आलेमाव यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन खासदार सार्दिन यांनी कोणतीच विकासकामे केली नाहीत अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी आज सार्दिन यांनी पत्रकार परिषद घेतली.

‘जे आंधळे व बहिरे आहेत, त्यांना आपण केलेला विकास कसा दिसेल?’ अशा प्रश्‍‍नाने सुरूवात करून सार्दिन यांनी चर्चिलवर निशाणा साधला.

चर्चिल हा पक्षांतर करणाऱ्यांचा बाप आहे. त्‍यांनी माकडाप्रमाणे उड्या मारत आपल्या राजकीय कारकिर्दीत कित्येक पक्ष बदलले.

हे करताना त्यांनी केवळ स्वत:चा स्वार्थ व पैसाच पाहिला असे सांगून सार्दिन म्हणाले की, आमचे धोरण स्पष्ट आहे.

कोणीही काम घेऊन आले तर त्याला हो किंवा नाही असे सरळ उत्तर देण्याचे. काम होत असेल तर ते आम्ही करुनच देतो. गत चार वर्षांत आपण अनेक विकासकामे केली. काही कामे सुरू आहेत.

यावेळी सार्दिन यांनी सरकारवरही टीका करताना रेती, दगड काढण्‍याचा व्‍यवसाय कायदेशीर करण्याचा सल्ला दिला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी बोलून म्हादईचा प्रश्र्न सोडवावा, अशी मागणी केली. दुहेरी रेल्वेमार्गाबद्दल आपण संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले.

लुईझिन चालेल, चर्चिल नकोच

लुईझिन फालेरो यांच्या संभाव्‍य काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना सार्दिन म्‍हणाले की, कोणीही काँग्रेस पक्षात आले तरी चालेल, आपली हरकत नाही.

एकवेळ लुईझिन चालेल पण चर्चिल मात्र नको रे बाबा, असे सांगून ते मोठ्याने हसले. म्हणजेच भविष्यात लुईझिन फालेरो काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता त्यांनी हसता हसता मान्‍य केली.

चर्चिल आलेमाव यांनी कधीही काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला नाही. उलट काँग्रेसचे आमदार फोडण्यात ते अग्रेसर राहिले आहेत. माझ्या निवडणुकीच्या वेळी चर्चिलनी पाठिंबा दिला नाही हे बरेच झाले. जर दिला असता तर कदाचित मी पराभूत झालो असतो.

- फ्रान्‍सिस सार्दिन, दक्षिण गोव्‍याचे खासदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October Heatwave: 41.4 अंश तापमानाने म्हापसा तापला? शहरातील उष्णतेच्या नोंदींकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

October Temperature: पारा चढला, गोवा तापला! 37.2 अंश तापमानाची नोंद; उष्णतेमुळे यलो अलर्ट जारी

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT