Canacona News: चक्क सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयालाच ठोकले टाळे, कर्मचाऱ्यांनाही कोंडले

काणकोणातील प्रकार : अपघात वाढूनही साबांखा उदासीन
Canacona News
Canacona NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Canacona News मडगाव-कारवार हमरस्त्यावरील करमलघाटात वारंवार अपघात होत असूनही सार्वजनिक बांधकाम खात्याचा हमरस्ता विभाग अकार्यक्षम ठरला आहे. त्याचेच प्रत्यंतर म्हणून काल मंगळवारी गुळे येथे झालेल्‍या अपघातात चापोली येथील एका दाम्‍पत्याचा हकनाक बळी गेला.

त्‍याच्या निषेधार्थ आज बुधवारी साबांखा हमरस्ता विभागाच्या काणकोणातील कार्यालयाला काँग्रेसचे जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांनी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन टाळे ठोकले आणि सरकारी अधिकाऱ्यांना कक्षात कोंबले.

Canacona News
37th National Games in Goa: 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोवा सज्ज, गोव्याच्या तयारीवर ‘ऑलिम्पिक’ संघटना समाधानी

हमरस्ता विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांना अनेकवेळा रस्त्याच्या दुरुस्‍तीबाबत निवेदने देण्यात आली. करमलघाटात धोकादायक वळणाच्या खाली असलेल्या 22 सागवानी वृक्षांची एका रात्रीत कत्तल करण्यात आली.

येथील बॅरिकेड्‌स तोडून दोन अवजड वाहने खोल दरीत कोसळली. मात्र या धोकादायक वळणावर धोक्याचा इशारा देणारा साधा फलकही खात्याने लावलेला नाही.

काणकोणमध्ये हमरस्ता विभाग असंवेदनशील बनला आहे. यावेळी रामू नाईक, वैष्णव पेडणेकर, क्लेस्टन व्हिएगस, विशाल पागी, सिद्धार्थ नाईक आदी कार्यकर्त्यांची उपस्‍थिती होती.

Canacona News
CM Pramod Sawant: सरकारी गृहकर्ज योजना पुढील वर्षापासून होणार पूर्ववत

तथाकथित नेत्यांवर कडक कारवाई गरजेची : रमेश तवडकर

सरकारी अधिकाऱ्यांना कक्षात कोंडून ठेवणाऱ्या तथाकथित नेत्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

करमलघाट रस्त्याची दुरवस्था त्याचप्रमाणे श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती याबाबत पंच रामू नाईक यांनी आज बुधवारी सकाळी उपोषण सुरू केले होते.

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्डचे नेते विकास भगत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या स्थानिक साहाय्यक अभियंत्याच्या कक्षाला टाळे ठोकले होते.

करमलघाट व गुळे येथील अपघातप्रवण रस्त्यांबाबत सरकार संवेदनशील आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com