Churchill Alemao AAP offer Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'आप’च्‍या 'ऑफर'वर अद्याप आपण विचारच केलेला नाही! नावेलीतून वालंका निवडणूक लढविणारच - चर्चिल आलेमाव

Churchill Alemao AAP offer: मी किंवा माझी कन्‍या वालंका यांनी ‘आप’च्‍या या ऑफरवर अद्याप कुठलाही विचार केलेला नाही, अशी प्रतिक्रिया बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्‍यक्‍त केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: आम आदमी पक्षाच्‍या गाेवा प्रभारी आतिषी आणि अन्‍य ‘आप’ नेत्‍यांनी आपली भेट घेऊन आपल्‍याला राजकीय ऑफर दिल्‍याची गोष्‍ट जरी खरी असली तरी मी किंवा माझी कन्‍या वालंका यांनी ‘आप’च्‍या या ऑफरवर अद्याप कुठलाही विचार केलेला नाही. आमचा निर्णय आम्‍ही याेग्‍यवेळी घेऊ, अशी प्रतिक्रिया बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी व्‍यक्‍त केली.

चर्चिल आणि आतिषी यांची भेट सध्‍या दक्षिण गोव्‍यात एक राजकीय चर्चेचा विषय बनलेला असताना आलेमाव यांनी आपली भूमिका जाहीर केली. बाणावली व नावेली या दोन्‍ही मतदारसंघात माझ्‍याबरोबर लोक आहेत.

त्‍यामुळे फक्‍त आपच नव्‍हे तर अन्‍य पक्षाचे नेतेही मला भेटत आहेत. मात्र आमचा निर्णय याेग्‍यवेळी आम्‍ही जाहीर करू, असे जरी असले तरी वालंका आलेमाव यावेळीही कुठल्‍याही स्‍थितीत नावेलीतून विधानसभा निवडणूक लढवतील, असे चर्चिल आलेमाव म्‍हणाले.

बाणावलीचे आमदार व्हेंझी व्‍हिएगस यांच्‍यावर ‘आप’चे नेते नाराज आहेत म्‍हणून तुम्‍हाला ते भेटले आहेत असे विचारले असता, त्‍यांच्‍या पक्षात काय चालू आहे हे मला माहीत नाही आणि मला त्‍यावर बाेलायचेही नाही. मला माझ्‍या मतदारांवर विश्‍वास आहे आणि आजवर त्‍यांच्‍या जोरावरच मी राजकारण करत आलेलो आहे, असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT