Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao: चर्चिल आलेमाव पुन्हा चर्चेत, आता लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार

राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात सामिल होणार असल्याची रंगली होती चर्चा.

Pramod Yadav

Churchill Alemao: बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी ऑगस्ट महिन्यात तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर आलेमाव यांचे पुढचे राजकीय पाऊल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कोणत्याही पक्षात सामिल होण्याचा दावा देखील त्यांनी खोडून काढला होता, दरम्यान, आता आलेमाव यांनी पुढील राजकीय प्रवासाबाबत मोठी घोषणा केली आहे.

चर्चिल आलेमाव यांनी आगामी लोकसभा निवडणूक अपक्ष लढविण्याचा निर्धार केला आहे. लोकांचा मला पाठिंबा असल्याने मी निवडणूक लढविणार असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकसभेच्या लढाईत गोव्यातून आणखी एक मोठे राजकीय व्यक्तीमत्व आता मैदानात उतरले आहे.

आलेमाव यांनी ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर ते राष्ट्रवादी अजितदाद गटासोबत जातील अशी चर्चा रंगली होती. मात्र, आलेमाव यांनी हे दावे फेटाळून लावले.

तृणमूलमधून बाहेर पडल्यानंतर आलेमाव यांनी अजितदादा गटाचे प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती. आलेमाव आता राष्ट्रवादीसोबत जाणार अशा चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान, पटेल यांच्यासोबत झालेली भेट राजकीय नव्हती तसेच, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा कोणताही विचार सध्या नाही असे स्पष्टीकरण आलेमाव यांनी यावेळी दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोवा होणार देशातले पहिले 'Air Sea Tourism Hub'! मुंबईतील परिषदेत खवंटेंचे सूतोवाच; ‘ओपन स्काय पॉलिसी’ची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; शिक्षकांना हवी सेवानिवृत्ती वयात वाढ!

Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

Goa Beaches: गोवा किनारी क्षेत्राबाबत नवी अपडेट! व्यवस्थापन आराखडा डिसेंबरमध्ये; मच्छीमार वस्तीमध्ये साकारणार पर्यटन प्रकल्प

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT