Churchill Alemao and Walanka will soon join Trinamool congress Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao : भाजपमुळेच देशात शांती : चर्चिल आलेमाव

मुख्यमंत्र्यांना वाढदिनाच्या शुभेच्छा : लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपला पाठिंबा

दैनिक गोमन्तक डिजिटल

भाजपमुळेच देशभरात शांती नांदत असून गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विकासाभिमुख प्रशासन दिले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात मी भाजप उमेदवारालाच पाठिंबा देणार, अशी घोषणा बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली.

दोन वेळा लोकसभेवर निवडून आलेले आलेमाव यांना पत्रकारांनी आज आगामी लोकसभा निवडणूक तुम्ही लढवणार का असे विचारले असता, मी निवडणूक लढवावी, असा आग्रह होत आहे. तरीही मी भाजप उमेदवारालाच पाठिंबा देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा सोमवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आलेमाव यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. मुख्यमंत्री सावंत यांच्या मदतीने मी बाणावली मतदारसंघाचा विकास केला, असा दावा त्यांनी केला.

वेंझी व्हिएगस हे ‘व्हॉट्स ॲप’ आमदार

बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस हे विकासकामे करण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहेत. त्यांची ओळख फक्त ‘व्हॉट्स ॲप आणि ड्रोन’ आमदार अशी करावी लागेल, अशी टीका चर्चिल यांनी केली.

निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात एक तरी काम केले आहे का, हे सांगावे. मी आमदार असताना २०० कोटींची विकासकामे मंजूर केली. वेंझी जी कामे दाखवितात, ती मी मंजूर केलेली आहेत, असा दावा आलेमाव यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT