Goa Cabinet Update : मंत्रिमंडळात 'या' आमदाराचा होणार समावेश, तर यांचा पत्ता कट; पक्षश्रेष्ठींची संमती

लवकरच होणार शपथविधी
Goa Assembly Monsoon Session
Goa Assembly Monsoon SessionDainik Gomantak
Published on
Updated on

राज्य मंत्रिमंडळात लवकरच बदल करून त्यात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आठजणांपैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असून लवकरच राज्य मंत्रिमंडळात एका नव्या मंत्र्याचा शपथविधी केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दैनिक ‘गोमन्तक’ला दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी आठ काँग्रेस फुटीर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी एका आमदाराला मंत्रिपद देण्याचे पक्षश्रेष्ठींशी बोलून निश्चित करण्यात आले होते. डिसेंबरमध्येच नवीन मंत्र्याचा समावेश करून घेण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी गोव्याला दिल्या असल्या तरी मागचे तीन महिने यासंदर्भातील निर्णय अडखळलेला होता.

जरी नव्या सदस्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय काँग्रेस फुटीरांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला, त्याचवेळी घेतला असला तरी मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू द्यायचा, याबद्दल अजूनही राज्यातील नेत्यांना निर्णय घेता आलेला नाही.

Goa Assembly Monsoon Session
Motorsports: राज्यातील रेसर्ससाठी महत्वाची बातमी! मोटरस्पोर्टस अरेनासाठी संघटनेतर्फे प्रयत्न सुरू

स्वतः प्रमोद सावंत यांनी गेल्या काही महिन्यांत पक्षाची कोअर समिती व मंत्रिमंडळातील काही सदस्यांबरोबर याबाबत चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी गोव्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ फेररचनेसंदर्भात राज्यातील नेत्यांसोबत चर्चा केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठजणांपैकी काही जणांना वेगवेगळी लाभाची पदे देण्याचे निश्चित झाले आहे. मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार नाही, हे आज सूत्रांनी स्पष्ट केले.

दिगंबर कामत यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यावेळी त्यांना काही महत्त्वाच्या सूचना केंद्रीय नेत्यांनी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कामत यांना दक्षिण गोवा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे करता येईल का, याची चाचपणी सध्या भाजपने चालवली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल केले जाणार

आहेत. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेल्या या माहितीमुळे फुटीर आमदारांपैकी केवळ नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. परवा झालेल्या फर्मागुढी सभेच्या पूर्वी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सिक्वेरा आणि कामत यांच्याशी चर्चा केली असून त्यांना योग्य ती पदे दिली जातील, असे आश्‍वस्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर कामत दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.

Goa Assembly Monsoon Session
37th National Games: सेलिंगमध्ये गोमंतकीयांचे भवितव्य उज्ज्वल- गोविंद गावडे

एका विद्यमान मंत्र्यावर टांगती तलवार

हळर्णकरांचे मंत्रिपद धोक्यात?

काँग्रेसच्या आठ आमदारांना घेतल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा जेव्हा सुरू झाली, तेव्हापासून मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्यावर टांगती तलवार होती. परंतु ज्या मंत्र्याला हटविले जाणार आहे, त्याचा फेरबदलानंतर उपद्रव होणार नाही ना? हे पाहूनच भाजप पाऊल टाकणार आहे.

राज्यात खारवी समाजाची अडीच ते तीन लाख मते आहेत. या मतांचा परिणाम लोकसभा निवडणुकीत होईल का, याचाही विचार हळर्णकरांना हटविताना भाजपला करावा लागणार आहे. मंत्र्यांची आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेऊन मंत्रिमंडळात बदल करायचा झाल्यास, हळर्णकर हे सध्या रडारवर आहेत.

गावडेंना तूर्तास हटवणे अशक्य

गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्रतिष्ठेची असून नियोजन आणि इतर कामे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्पर्धेच्या तोंडावर क्रीडामंत्री बदलणे योग्य होणार नाही, याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे.

आतापर्यंत गोविंद गावडे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे नेतृत्व अखिल भारतीय पातळीवरही केले आहे. दुसरीकडे एसटी आरक्षणासाठी सरकारवर दबाव वाढत असून अशा स्थितीत गावडेंना हटवणे सरकारला मारक ठरेल, अशी अटकळ आहे.

रवी नाईकांचे स्थान अबाधित

फोंडा महालातील कृषिमंत्री रवी नाईक लौकिकार्थाने मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडताना क्रियाशील दिसत नाहीत, त्यांचे स्थान धोक्यात आहे, अशी अटकळ होती. मात्र, भंडारी समाजातील त्यांचे वजन, त्यांना मानणारा वर्ग विचारात घेता रवींना दुखवणे पक्षाला हितकारक ठरणार नाही. म्हणूनच रवींवरील जबाबदारी कमी करण्याचे धाडस पक्षनेतृत्व करणार नाही, असेच दिसते. फोंडा पालिका निवडणूकही त्यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जात आहे, हे विशेष.

कामतांना केंद्रात पाठवणार?

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे वरिष्ठ असल्याने विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करणार का, हा प्रश्‍न कायम आहे. यासाठीच त्यांना राज्यसभा देऊन केंद्रात पाठवण्याची किंवा दक्षिण गोवा मतदारसंघातून निवडणूक लढवू द्यायची का, याबाबत स्थानिक आणि केंद्रीय पातळीवर समन्वयाची बैठक होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांना राज्यात मंत्रिपद दिले जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

कामत, मायकल तूर्तास मंत्रिमंडळाबाहेर

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, दिलायला लोबो, मायकल लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक या आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपममध्ये प्रवेश केला होता.

तेव्हापासूनच यातील कुणाची वर्णी मंत्रिमंडळात लागणार, याची चर्चा होती. यापैकी लोबो, कामत आणि सिक्वेरा वगळता इतरांचे राजकीय पुनर्वसन केले आहे. मात्र, आता नव्या बदलात सिक्वेरांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. परंतु लोबो आणि कामत यांना तूर्तास बाहेरच ठेवले जाईल, असे बोलले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com