Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

Louis Berger Case: 'मी जेलमध्ये गेलो अन् खरे गुन्हेगार मंत्री झाले!' लुईस बर्जर प्रकरणी चर्चिल आलेमाव कडाडले; राजकीय सूडबुद्धीने गोवल्याचा केला गंभीर आरोप

Churchill Alemao On Louis Berger Case: गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी राज्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधला.

Manish Jadhav

मडगाव: गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी राज्यातील वाढत्या अंमली पदार्थांच्या मुद्द्यावरुन सरकारवर निशाणा साधतानाच आपल्यावरील जुन्या पोलीस कारवाईबद्दलचा संतापही व्यक्त केला. "राजकारणात अनेक संकटांचा सामना करावा लागतो, पण मला लुईस बर्जर लाच प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले. एवढचं नाहीतर तुरुंगातही धाडण्यात आले," असा गंभीर आरोप आलेमाव यांनी केला.

"मी लुईस बर्जरला कधी पाहिलंच नाही"

चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी बोलताना सांगितले की, ज्या लुईस बर्जर प्रकरणाचा बागुलबुवा करुन मला जेलमध्ये टाकले, त्या व्यक्तीला मी आयुष्यात कधीही भेटलो नाही. "तो माणूस कोण आहे, हे मला आजही माहीत नाही. तरीही राजकीय सूडबुद्धीने मला तुरुंगात धाडण्यात आले. पण खरी गम्मत बघा, जे लोक खरोखरच या व्यवहारात सामील होते, ते नंतरच्या काळात मंत्री झाले आणि आज सत्तेत राहून 'सुशेगात' (शांतपणे) आयुष्य जगत आहेत," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांमधील काही नेत्यांवर बोचरी टीका केली.

ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारला घेरले

राज्यातील ड्रग्जच्या वाढत्या प्रकरणांवर बोलताना आलेमाव यांनी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळातील एका घटनेची आठवण करुन दिली. "मी विधानसभेत जेव्हा तुरुंगातील ड्रग्ज विक्रीचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा प्रशासनाकडून छातीठोकपणे सांगण्यात आले होते की, जेलमध्ये ड्रग्ज नाहीत. मात्र, नंतरच्या काळात तुरुंगातही ड्रग्ज सापडले आणि माझे म्हणणे खरे ठरले," असे त्यांनी नमूद केले. आजच्या घडीला गोव्यातील अंमली पदार्थांचे जाळे शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचले असून हे राज्यासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

कठोर कारवाईची मागणी

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 'पेडलर्स'ना कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ नका, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. विशेषतः महाविद्यालयांच्या परिसरात कडक पोलीस पाळत ठेवून गुन्हेगारांना अद्दल घडेल अशी शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. कायद्यातील पळवाटा शोधून गुन्हेगार सुटणार नाहीत, यासाठी सरकारने कडक कायदेशीर तरतुदी कराव्यात, असेही ते म्हणाले. चर्चिल आलेमाव यांच्या या विधानामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा 'लुईस बर्जर' प्रकरणाची आणि राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेची चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT