Churchill Alemao on Mann Ki Baat@100 Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao: नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान कधीही पहिला नाही; मन की बात@100 नंतर चर्चिल म्हणाले की...

कुडतरी हा माझा मतदारसंघ असून इथून मी कधीही निवडून येऊ शकतो; चर्चिल यांचा विश्वास

दैनिक गोमन्तक

Churchill Alemao on Mann Ki Baat@100: आज रविवार 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम गोव्यातील अनेक नेत्यांनी पाहिला. यानंतर काहींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत चर्चिल आलेमाव यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. ‘मन की बात’च्या शंभराव्या भागानंतर चर्चिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि असा पंतप्रधान याआधी पहिला नसल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी मत व्यक्त करताना ते म्हणाले की, भाजपचे काम मला आवडते. जरी मी तिकडे प्रवेश केला नसला तरीही त्यांच्या कामाची कल्पना मला आहे. भाजप हा सर्व धर्मांना समान मानणारा पक्ष आहे.

ते पुढे म्हणाले की, कुडतरी हा माझा मतदारसंघ असून इथून मी कधीही निवडून येऊ शकतो कारण कुडतरीचे लोक माझ्यावर प्रेम करतात. शिवाय मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा चाहता आहे, मी त्यांच्यासारखा पंतप्रधान कधीच पाहिला नाही.

हल्लीच चर्चिल आलेमाव यांनी राज्यांतील तसेच केंद्रातील भाजप सरकारचे गोडवे गाताना लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर भाजप जिंकून येईल असे भाकीत केले होते. या नंतर चर्चिल भाजप पक्षात सामील होतील या चर्चेने जोर धरला होता.

चर्चिल आलेमाव हे सुरुवातीपासून भाजप पक्षाचे 'वेल व्हिशर' आहेत पण भाजप प्रवेश करण्याबाबत त्यांनी अजून तरी कोणतेही संकेत दिलेले नाहीत असा खुलासा भाजप प्रदेशाअध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला आहे. त्यामुळे खरंच चर्चिल आलेमाव हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT