Cash For Job Scam Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Christopher Fonseka: सोमवारी (25 नोव्हेंबर) आयटकच्या झालेल्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील गाजत असलेल्या नोकरी घोटाळ्याप्रकरणावर त्यांना प्रश्न केल्यावर वरील मत व्यक्त केले.

Manish Jadhav

पणजी: ‘कॅश फॉर जॉब''प्रकरणात तो मी नव्हेच असे म्हणणारे सत्ताधारी राजकारण्यांचा सहभाग आहेच. परंतु घोटाळ्याला विरोधी पक्षही तेवढाच जबाबदार असल्याचा आरोप ‘आयटक’ नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला आहे.

सोमवारी (25 नोव्हेंबर) आयटकच्या झालेल्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील गाजत असलेल्या नोकरी घोटाळ्याप्रकरणावर त्यांना प्रश्न केल्यावर वरील मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, नोकरी घोटाळ्यात सत्ताधारी आहेत, हे स्पष्ट आहे.

पोलिस यंत्रणा राज्यातील राजकारण्यांना क्लिन चीट देऊच शकत नाही, त्यांना ते सांगण्याचे हक्क नाहीत. एकही मंत्री या प्रकरणात सहभागी नसल्याचे पोलिस कसे सांगू शकतात. प्रत्येकाचे हात बरबटलेले आहेत. देवापुढे शपथ घेणारे असे कसे सांगू शकतात, असा सवालही त्यांनी व्यक्त केला. ‘कॅश फॉर जॉब’ हा सर्वात मोठा घोटाळा आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आपणच प्रथम याविषयी पूजा नाईक हिला पकडून दिले, असा दावा केला. त्यांनी जनतेला अशा प्रकारांविषयी तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. तरीही त्यांनी अशा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची तयारी दर्शविलेली नाही. विशेष तपास पथक स्थापन केलेले नाही. पोलिसही नोकऱ्यांसाठी घेण्यात आलेले पैसे कोणापर्यंत पोहोचले, ते शोधून काढू शकलेले नाहीत. संशयितांना जामीन मिळाल्याने फसवणुकीच्या प्रकरणांतून फारसे काही निष्पन्न होईल, असे जनतेला वाटत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT