Christmas Food in Goa Dainik Gomantak
गोवा

Christmas Food in Goa: गोव्यामध्ये नाताळात हमखास चाखायला मिळतात 'हे' खास गोड पदार्थ

Christmas Food in Goa: गोव्यामध्ये ख्रिस्ती धर्मियांमध्‍ये नाताळानिमित्त विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविणे सुरु झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Christmas Food in Goa: गोवा राज्यात सर्वत्र नाताळ सणाची लगबग सुरू आहे. बाजारात सजावटीसाठी लागणारे साहित्य दाखल झाले असून ते खरेदीसाठी गर्दी होत आहे. सोबतच ख्रिस्ती धर्मियांमध्‍ये आता नाताळानिमित्त विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविणे सुरू झाले आहे. ज्याप्रमाणे हिंदू लोक गणेश चतुर्थीच्‍या काळात करंज्या, लाडू, मोदक बनवितात, त्याचप्रमाणे ख्रिस्तीबांधव नाताळनिमित्त विशिष्ट प्रकारचे गोड पदार्थ आवर्जून बनवितात.

गोव्यात नाताळानिमित्त जे गोडपदार्थ बनविले जातात त्‍यात केवळ एक केक सोडला तर सर्व पदार्थांमध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. खोबऱ्याच्या वापरामुळे सर्व पदार्थांना एक विशिष्ट चव येते. सोबतच हे पदार्थ अतिशय लुसलुशीत, मऊ बनतात.

बिबिन्का, दोदोल, करंज्या, बाथ्क, दॉश, कोकाद, पिनाग, गॉस, रोज कुकी आदी पदार्थांमध्ये प्रामुख्याने ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो. त्यासोबतच काही पदार्थांमध्ये अंड्याचादेखील वापर केला जातो. या गोड पदार्थांचे वाटप नाताळाच्‍या आदल्‍या दिवशी केले जाते. आपल्या शेजारील कुटुंबियांना, आपल्या मित्रपरिवाराला गोडपदार्थ दिले जातात.

सॅसी सिक्वेरा, पणजी-

पूर्वी शेजारील महिला एकत्र येऊन नाताळानिमित्त गोड पदार्थ बनविले जायचे. प्रत्‍येक दिवशी एकाच्‍या घरी जाऊन हे गोडपदार्थ महिला बनवत असत. मात्र आता बहुतांश ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या घरीच गोड पदार्थ बनवितात.

सिएना डिसोझा-

नाताळानिमित्त गोड पदार्थ बनविण्याचा उत्साह आगळाच असतो. हे पदार्थ चुलीवर केले तर त्याची चव न्‍यारीच असते. मात्र आता बहुतांश मिठाई, गोड पदार्थ शेगडीवरच केले जातात. चुलीवरील पदार्थ मागे पडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT