Christmas Celebration In Goa
Christmas Celebration In GoaDainik Gomantak

Christmas Celebration In Goa: गोव्यात नाताळ सणाची धामधूम सुरु; बच्चे कंपनी 'फूल टू रेडी'

Christmas Celebration In Goa: गोव्यात नाताळ उत्‍सवानिमित्त उत्‍साही सर्वत्र वातावरण निर्माण झाले आहे.
Published on

दरवर्षी ख्रिसमस हा सण 25 डिसेंबरला साजरा केला जातो. जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हा सण ख्रिस्ती धर्मियांसोबत इतर धर्माचे लोकही साजरा करतात. या सणाबद्दल लहान मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. या दिवशी सांता क्लॉज मुलांना भेटवस्तू देतात, अशी मान्यता आहे. पालक त्या रुपाने मुलांना भेटवस्तू देत असतात. राज्‍यात या उत्‍सवानिमित्त उत्‍साही वातावरण निर्माण झाले आहे.

ख्रिसमस सणाकडे एक सांस्कृतिक उत्सव म्हणूनही पाहिलं जातं. प्रभू येशू यांचा जन्म या दिवशी झाल्याने ख्रिस्ती धर्मियांमध्ये उत्साह असतो. ख्रिसमस सण पूर्वसंध्येला सुरु होतो. चर्चमध्ये धार्मिक प्रार्थनेचं आयोजन केलं जातं आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. घरी केक, गोड पदार्थ केले जातात. कुटुंबियांसोबत हा सण एकत्र साजरा केला जातो. तसेच घराबाहेर चांदणी आणि प्रभू येशूंच्या जन्माचे देखावे केले जातात.

Christmas Celebration In Goa
Christmas Festival in Goa: 'जिंगल बेल, जिंगल बेल' बेताळभाटीत सजतेय 'आनंदनगरी'

दरम्‍यान, सांता निकोलस यांना सांता क्लॉजच्या नावाने ओळखलं जाते. त्यांचा जन्म प्रभू येशूनंतर जवळपास 280 वर्षांना झाला होता. सांता निकोलस यांनी आपलं पूर्ण जीवन प्रभू येशूंना समर्पित केलं होतं. दरवर्षी ते येशूच्या जन्मदिनाचं औचित्य साधत अंधारात मुलांना भेटवस्तू द्यायचे. तेव्हापासून आतापर्यंत ही प्रथा आहे. आजही लोकं सांता क्लॉज बनून मुलांना भेटवस्तू देतात. दुसरीकडे ख्रिसमस ट्री सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com