Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Goa Christmas 2024: डिचोलीत नाताळाची लगबग! ‘ख्रिसमस’ साहित्याने फुलली बाजारपेठ

Bicholim Market: ‘नाताळ’ म्हणजे ख्रिस्ती बांधवांचा उत्साह द्विगुणित करणारा सण. हा सण जवळ आल्याने डिचोलीत नाताळ सणाची लगबग सुरू झाली असून या सणाची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: ‘नाताळ’ म्हणजे ख्रिस्ती बांधवांचा उत्साह द्विगुणित करणारा सण. हा सण जवळ आल्याने डिचोलीत नाताळ सणाची लगबग सुरू झाली असून या सणाची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

बाजारातील काही दुकानेही ‘ख्रिसमस’ साहित्याने फुलली असून ख्रिस्ती बांधव नाताळ सणाच्या तयारीला लागले आहेत. डिचोली (Bicholim) शहरात ख्रिस्ती बांधवांची लोकसंख्या कमी असली, तरी ख्रिस्ती बांधव नाताळ सण परंपरेप्रमाणे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात.

शहरातील काही दुकाने ख्रिसमस साहित्याने सजली आहेत. या दुकानातून ख्रिसमस ट्री, स्नोबॉल, सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या, तयार गोठे आणि वेगवेगळ्या आकारांची रंगीबेरंगी नक्षत्रे आदी सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीस उपलब्ध झाले असून त्याची खरेदीही सुरू झाली आहे. ‘नाताळ’साठी लागणाऱ्या करंज्या आदी खाद्यपदार्थ बनविण्याचीही लगबग सुरू आहे.

देखाव्यांची तयारी

‘ख्रिसमस’निमित्त डिचोली शहरासह आसपासच्या परिसरातील घरांसह कपेल, क्रॉस (खुरीस) यांची रंगरंगोटी सुरू झाली आहे. ख्रिस्ती बांधवांनी सध्या गोठा आदी सजावटीच्या कामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. नाताळाच्या पूर्वरात्री शहरातील अवरलेडी ऑफ ग्रेस सायबिणीच्या चर्चमध्ये प्रार्थनासभा आदी कार्यक्रम होणार आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारीत भव्य देखावे उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील आठवड्यात शहरात ख्रिसमसचा (Christmas) उत्साही माहोल तयार होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT