सेंबरमध्ये नाताळच्या दिवसांत गावागावांत उत्साह असतो. छोटेखानी कपेलांची रंगरंगोटी केली जाते. घराबाहेरची कुंपणे चांगली घासून त्यालाही सफेद रंग लावला जातो. संपूर्ण घराला रंग… दारात गोठ्याची तयारी चालते. हिंदुबांधवांचे जसे आकाशकंदील असतात; तसेच नाताळच्या सणावेळी ख्रिश्चन बांधवांच्या दारांत नक्षत्र दिवा (स्टार) लावला जातो. त्याला ‘नखेत्र’ म्हणतात. साधारणपणे २५ डिसेंबरला सुरू होणारे हे नाताळ पर्व नवे वर्ष येईपर्यंत सुरूच असते, तात्पर्य त्या सणाचा उत्साह-आनंद कायम असतो. गावात गजबच, प्रत्येक ख्रिश्चनबांधवांच्या घरातदारांत सजावट असते. हिंदुबांधव जसे दिवाळीला फराळ बनवतात, तसेच खाद्यजिन्नस नाताळात बनवले जातात.
नाताळनिमित्तचा बाजारात झगमगाट असतो, तयार गोठेही मिळतात, नाताळ वृक्षांचीही बाजारात रेलचेल असते. अर्थांत खरेदी-विक्री विशेषत: महिला मंडळींच्या पुढाकाराने घरोघरी होत असते. काही सजावटीचे साहित्य आजकाल ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातूनही खरेदी केले जातात.
पूर्वी सर्व ख्रिस्ती बांधव आगळ्यावेगळ्या उत्साहाने सणांची तयारी करताना दिसत. पण आता काळ बदलला, आधुनिकतेचा साज चढला, अन् नाताळ सण खूपच आगळावेगळा बनला आहे. पूर्वी अंगणात गोठा करायला ख्रिस्तीबांधवांची कितीतरी धडपड असायची. त्या काळातला तो गोठा करणे म्हणजे, एक महिना अगोदर तयारी असायची.
जागा स्वच्छ करणे, रेती घेऊन येणे, शेतात जाऊन गवत गोळा करून आणणे, धान्य रूजत घालणे… केवढी ती धडपड असायची! आता तयार गोठेही बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. सजावट साहित्याचीही बाजारात रेलचेल असून विद्युत रोषणाईही जोरदारपणे आधीपासूनच केली जाते. नाताळनिमित्तचा गोठा बनवायचे काम जास्त करून मुलांकडेच असायचे.
नंतर मग इतरांनी बनवलेले गोठे पाहण्यासाठी एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. गोठ्यात ‘जेजू’ अर्थांत येशू ख्रिस्त जन्माला येतो असा देखावा केला जातो. ती सायबीण, ती गुरे, राखणदार अशा काही छोट्या छोट्या मातीच्या मूर्ती ठेवल्या जातात. दारात गोल रंगीत कागदांचे कंदील लावले जातात. रात्री बारा वाजता ‘जेजू’ (येशू) जन्माला यायचा व तेव्हाच नाताळ सुरू व्हायचा. ‘हॅपी ख्रिसमस’ म्हणत सगळे बांधव एकमेकांना आलिंगन द्यायचे. कामानिमित्त, नोकरीनिमित्त दूरवर असलेल्या बंधू-भगिनी एकत्र येतात.
आता नाताळानिमित्त सार्वजनिक ठिकाणी गोठा बनवला जातो. गावापासून दूर असलेले ख्रिश्चनबांधव तेथे जाऊन सणाचा आनंद मिळवतात. गोव्यात नाताळ सणाचा उत्साह गावांप्रमाणेच शहरांतही पाहायला मिळतो. नाताळानिमित्त चर्चच्या परिसरात गर्दी असते. तसेच, जानेवारीच्या सुरुवातीला अनेक चर्चची ‘फिस्ट’ (फेस्त) होतात. तात्पर्य , अजूनही ख्रिश्चनबांधव नाताळचा सण खूप उत्साहाने साजरा करतात, तेवढ्याच आनंदात नव्या वर्षाचे स्वागत करतात. ‘हॅपी न्यू ईअर’
नाताळ हा येशू ख्रिस्तांच्या जन्माचा दिवस असून ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. गोव्यातील चर्चमध्ये नाताळच्या पूर्व मध्यरात्री मिडनाईट मास मोठ्या भक्तिभावाने केली जाते. नाताळच्या प्रार्थनासभेला ‘मीस’ असे संबोधले जाते.
सांताक्लॉजची क्रेझ!
मोबाईलचा जमाना काही ठिकाणी पहिल्यासारखे नाताळाची शुभेच्छापत्र आप्त स्नेही यांना पाठवली जातात. काही पत्रांत बायबलमधील विचार बर्फाने व्यापलेला प्रदेश सांताक्लॉज त्याची गाडी ख्रिसमस ट्री अशी विविध चित्रे यात असतात.
ख्रिसमसमध्ये लहान मुलांचं मुख्य आकर्षण म्हणजे सांताक्लॉज. सांताक्लॉज मुळे लहान मुलांबरोबरच मोठ्यांमध्येही ख्रिसमसच्या सणाची लोकप्रियता प्रकर्षाने जाणवते. याचे कारण म्हणजे लहान मुलांमध्ये असलेली जिज्ञासा ती म्हणजे रात्री सांताक्लॉज येतो आणि आपल्या उशीखाली चॉकलेट्स ठेवून जातो. ही संकल्पनाच मनाला आनंद देणारी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.