Goa News: 'बर्च बाय रोमियो लेन'चा भागीदार अजय गुप्ताला 5 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,क्रीडा,मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये
Birch Case Goa
Birch Case GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगाव नगर परिषद जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात मासळी बाजार स्थलांतरित करणार

मुरगाव नगर परिषद जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात मासळी बाजार स्थलांतरित करणार आहे.तर वास्को बस स्थानक संपूर्ण मुरगाव तालुक्यात आर्थिक पुनरुज्जीवनासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे असे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

'सनबर्न'च्या अनुपस्थितीचा फटका! गोव्यात हॉटेल्स 50% रिकामी

गोव्याच्या पर्यटनाचा कणा मानला जाणारा 'सनबर्न' ईडीएम महोत्सव यंदा मुंबईत स्थलांतरित झाल्यामुळे गोव्यातील हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात जिथे हॉटेल्स हाऊसफुल्ल असायची, तिथे यंदा हॉटेलमधील निवासाचे प्रमाण केवळ ४५ ते ५० टक्क्यांवर आले आहे.

स्नेहल कौठणकरचे झंझावाती शतक! विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याचा छत्तीसगडवर शानदार विजय

जयपूर येथे खेळल्या गेलेल्या 'एलिट ग्रुप' सामन्यात गोव्याच्या संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर छत्तीसगडचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो सलामीवीर स्नेहल कौठणकर, ज्याने नाबाद १०७ धावांची खेळी करत गोव्याला विजय मिळवून दिला.

सामन्याचा आढावा: छत्तीसगडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत २३३ धावांचे आव्हान गोव्यासमोर ठेवले होते. हे आव्हान गोव्याने अतिशय सहजपणे पार केले. गोव्याने ४ गड्यांच्या मोबदल्यात २३४ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

सॅव्हियो रॉड्रिग्ज यांना पक्षात कोणतेही पद नाही, दामू नाईकांनी स्पष्ट सांगितलं

सॅव्हियो रॉड्रिग्ज यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नाही. मी अध्यक्ष झाल्यापासून आम्ही नियुक्त केलेल्यांनाच अधिकृत सदस्य म्हणून मान्यता दिली जात असल्याचे गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.

भाजपतर्फे उद्यापासून राज्यभर 'सुशासन दिन'

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उद्या गुरुवारपासून पुढील ८ दिवस राज्यभर 'सुशासन दिन' होणार साजरा. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाजपेयींचा जीवन प्रवास, काम जनतेपर्यंत पोहोचवणार : दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप

पुराव्याशिवाय आरोप करणे सोपे; 'त्या' कथित लाचखोरीच्या पोस्टवर मंत्री माविन गुदिन्हो यांची प्रतिक्रिया

भाजप नेते साविओ रॉड्रिग्स यांनी सोशल मीडियावर 'राजकीय गप्पा' म्हणून शेअर केलेल्या लाचखोरीच्या दाव्यावर मंत्री माविन गुदिन्हो यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "सत्यता पडताळून न पाहता कोणीही कोणावरही आरोप करू शकते," अशा शब्दांत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. ही पोस्ट सध्या चर्चेत असली तरी, केवळ आरोपांच्या आधारे निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी सुचवले आहे.

गुदिन्हो यांनी पुढे माहिती दिली की, पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून सध्या याची चौकशी केली जात आहे. पक्षांतर्गत बाबींवर आणि शिस्तीवर वरिष्ठ नेत्यांचे लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. साविओ रॉड्रिग्स यांनी आपल्या पोस्टमध्ये एका नवीन आमदाराने १० लाख रुपये घेऊन नंतर परत केल्याचा दावा केला होता.

"आता सर्व काही दंडाधिकारी चौकशीवर अवलंबून"

हडफडे येथील भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण गोवा हादरला असताना, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "माझा एकमेव उद्देश या आगीत प्राण गमावलेल्या निष्पाप लोकांसाठी न्याय मिळवणे हा आहे," असे लोबो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

'बर्च बाय रोमियो लेन'चा भागीदार अजय गुप्ताला 5 दिवसांची पोलीस कोठडी

हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणात अटकेत असलेला तिसरा भागीदार अजय गुप्ता याच्या अडचणींत वाढ झाली आहे. म्हापसा न्यायालयाने अजय गुप्ताला आज ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोव्याच्या राजकारणात 'लाचखोरी'ची चर्चा!

गोव्यातील भाजप नेते साविओ रॉड्रिग्स यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी #GoaPoliticalGossip या हॅशटॅगचा वापर करत एका पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदाराने सत्ताधारी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

पिग्मी कलेक्टरच्या हातातील बॅग हिसकावणाऱ्या 20 वर्षीय युवकाला अटक

पिग्मी कलेक्टरच्या हातातील बॅग हिसकावणाऱ्या 20 वर्षीय युवकाला अटक. डिचोलीतील प्रकार उघडकीस. रोख रकमेने भरलेले बॅग हस्तगत. मध्यप्रदेशमधील संशयित युवकाचे नाव अमित गुज्जर असल्याचे उघड. साथीदाराचा शोध सुरु.

ISRO BlueBird Block-2 Satellite: इस्रोने ब्लू बर्ड ब्लॉक-२ उपग्रहाचे केले यशस्वी प्रक्षेपण

इस्रोच्या LVM3 रॉकेटने बुधवारी सकाळी ब्लू बर्ड ब्लॉक-२ उपग्रहाला यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रक्षेपित केले. हे रॉकेट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून सकाळी ८:५५ वाजता प्रक्षेपित झाले आणि उपग्रहाला योग्य कक्षेत स्थापित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com