Chorla Ghat Accident Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात! ट्रकचा चकणाचूर; एकाचा जागीच मृत्यू , दुसरा गंभीर

Goa Accident Death News: चोर्ला घाटातील वाइल्डरनेस्ट नेचर रिसॉर्टजवळ सकाळी ७:२४ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

चोर्ला घाटातील वाइल्डरनेस्ट नेचर रिसॉर्टजवळ सकाळी ७:२४ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. घाटमाथ्यावरून जात असलेल्या ट्रकचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. अपघातात ट्रकमधील एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. घाटरस्त्यावर तीव्र वळणे असल्याने चालकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT