Salim Ali Bird Sanctuary Goa Dainik Gomantak
गोवा

Salim Ali Bird Sanctuary Goa : पक्षी अभयारण्यात चोडणवासीयांना मोफत प्रवेश द्या : ग्रामसभेत मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Salim Ali Bird Sanctuary Goa : सलीम अली पक्षी अभयारण्यात चोडण बेटावरील स्थानिक रहिवाशांना मोफत प्रवेश देण्याची मागणी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली. हा प्रश्‍न १५ दिवसांत सोडवावा, असे आवाहन स्थानिकांनी आमदार प्रेमेेंद्र शेट यांना केले. स्थानिकांच्या आग्रहानुसार हा विषय लवकरच धसास लावू, अशी ग्वाही आमदार शेट यांनी यावेळी दिली.

रविवारी चोडण-माडेलची ग्रामसभा सरपंच पंढरी वर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार प्रेमेेंद्र शेट उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच श्रीकृष्ण हळदणकर यांनी हा ठराव मांडला. दोना पावल येथील जेटीवर जाण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जात असले, तरी गोमंतकीयांना मोफत प्रवेश देण्यात येतो.

गोव्यातील इतर पर्यटन स्थळांवरही स्थानिकांना विनाशुल्क प्रवेश आहे. त्याप्रमाणे चोडण पक्षी अभयारण्यातही चोडणवासीयांना मोफत प्रवेश असावा.

हा आमचा अधिकार असून याची पूर्तता आमदार शेट यांनी १५ दिवसांत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली असता, शेट यांनीही त्याला संमती दिल्याने उपस्थितांनी शेट यांचे अभिनंदन केले.

यावेळी हळदणकर यांनी फेरीबोट सेवेविषयी काही प्रश्‍न उपस्थित केले. हे प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही शेट यांनी दिली.

स्थानिकांना व्यवसाय- नोकरीतही स्थान हवे!

सलीम अली पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्कातील २० टक्के वाटा स्थानिक पंचायतीला द्यावा, तसेच अभयारण्यातील ९० टक्के व्यवसाय आणि नोकऱ्या चोडणवासीयांना द्याव्यात. अभयारण्य परिसरात चोडण बेटावरील मच्छीमारांना मच्छीमारी करण्यास परवानगी द्यावी, असाही ठराव ग्रामसभेत मांडण्यात आला.

पार्किंग प्रश्‍न सोडवा

या अभयारण्याचे प्रवेशद्वार चोडण फेरी धक्क्याजवळच असल्याने अभयारण्यात येणारे पर्यटक आपली वाहने धक्क्यावरच पार्क करून ठेवतात. त्यामुळे इतर लोकांना वाहने उभी करायला जागाच मिळत नाही. येथील पार्किंगचा प्रश्र्नही त्वरित सोडवावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी आमदार शेट यांच्याकडे केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT