Chimbel Unity Mall Dainik Gomantak
गोवा

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात बांबोळी, नावशीही; किनारपट्टी भागातील गावांचा वाढतोय पाठिंबा, चिंबलमध्ये एकजूट

Goa Unity Mall: चिंबल गावातील प्रस्तावित युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला बांबोळी आणि नावशी येथील ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: चिंबल गावातील प्रस्तावित युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला बांबोळी आणि नावशी येथील ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिला. चिंबलमधील ग्रामस्थांचा उपोषणाचा आज १४ वा दिवस असून, या आंदोलनाला किनारपट्टी भागातील विविध गावांतून पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे.

यासंदर्भात, अ‍ॅड. सुरेश पालकर यांनी सांगितले की, बांबोळी आणि नावशी येथील ग्रामस्थ हे चिंबलवासयांसोबत या कठीण दिवसात आहेत. ते आमच्या लढ्यात सहभागी आहेत. केवळ शाब्दीक संवेदना व्यक्‍त न करता त्यांनी सक्रीय सहभाग आंदोलनात घेतला आहे.

हे लोण इतर गावांतही पसरणार आहे. काकरा, ओडशेल, शिरदोन, दोनापावला, ताळगावसह करमळी, नेरुल, डोंगरी आदी संपूर्ण किनारपट्टीपट्टा चिंबलच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार आहे. या आंदोलनाला कोणीही रोखू शकणार नाही. यावेळी त्यांनी भाजप सरकार तसेच स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांना थेट आव्हान देत, आदिवासी समाजाला गृहीत धरू नये, असा इशाराही दिला.

उपोषण सुरूच राहणार : चोपडेकर

चिंबल येथील कदंब पठारावरील प्रस्तावित युनिटी मॉल व प्रशासकीय स्तंभ प्रकल्पाला विरोधात सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाला पंचायतीचे पंच सदस्य रवींद्र चोपडेकर यांनी पाठिंबा दर्शविला आहे. लोकांनी घेतलेल्या भूमिकेबरोबर आपण राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जोपर्यंत हे प्रकल्प याठिकाणाहून हटविले जात नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. दररोज, याठिकाणी विविध गावचे ग्रामस्थ येऊन पाठिंबा देत आहेत, आता पंचायतीच्या एक सदस्याने उघडपणे आपली भूमिका मांडली आहे. पंचायतीने दिलेल्या ठरावामुळेच या कामाला सुरूवात झाल्याने हा वाद न्यायालयात गेला आहे.

आंदोलनाचे वेळापत्रक असे...

रविवार, ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सांताक्रूझ येथील आमदार कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असून मॉलबाबत त्यांची स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणीही केली जाणार आहे.

मंगळवार, १३ जानेवारी रोजी पंचायत कार्यालयासमोर आंदोलन करून, ग्रामसभेच्या तीन ठरावांचे पालन न करता जीटीडीसीला दिलेला बांधकाम परवाना रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे.

गुरुवार, १५ जानेवारी रोजी चिंबल ग्रामस्थांचा सचिवालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची ठाम मागणी करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT