Chimbel Unity Mall Protest DAinik Gomantak
गोवा

Chimbel: "..तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही"! 21 दिवसांपासून चिंबलवासीयांचे उपोषण सुरूच; प्रकल्पाच्या निर्णयानंतर ठरवणार आंदोलनाची दिशा

Chimbel Unity Mall Protest: चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्प रद्द करावेत, या मागणीवर उपोषणकर्ते ठाम आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्प रद्द करावेत, या मागणीवर उपोषणकर्ते ठाम आहेत. याबाबत सरकारकडून अधिकृत निर्णय जाहीर झाल्याशिवाय त्या जागेवरून न हटण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. २१ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे.

पर्वरी वेलफेअर ग्रुपचे विकास प्रभुदेसाई यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. प्रभुदेसाई यांनी सांगितले की, एका मंत्र्याच्या मतदारसंघातील लोकांनाही अशाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

चिंबल ग्रामस्थांनी तोयार तलाव आणि त्याच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने जो लढा उभारला आहे, तो खरोखर इतरांसाठी प्रेरणादायी आहे. उपोषणकर्त्यांनी तलावाच्या परिसरात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचे अनेक नमुने गोळा केले, जे नंतर आंदोलनस्थळी प्रदर्शित करण्यात आले.

दरम्यान, विधानसभेवर काढलेल्या मोर्चावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे सोमवार किंवा मंगळवारी या प्रकल्पाचा निर्णय होऊ शकतो. त्यानंतरच पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले. त्‍यांनी गुरुवारी विधानसभेवर मोर्चा काढला होता, परंतु अधिवेशन सुरू असल्याने पोलिसांनी हा मोर्चा मेरशी चौकातच अडवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..शेवटी गोव्याचा आंबा तो गोव्याचा! तोच खरा बाकीचे सगळे पोरकारी! गोंयकार, आंबे आणि बरेच काही

सालाझारने गोवा हा पोर्तुगालचाच एक ‘ऑफशोर’ प्रांत आहे अशी उठवलेली आवईही कुठल्याही तणावाशिवाय आपण पचवली; ओपिनियन पोलचे कवित्व

Goa Opinion: आजचा 'गोवा' हा पोर्तुगिजांनी 18व्या शतकाच्या अखेरीस काबीज केलेला भूभाग होय; गोवन आधुनिकता

Chimbel Protest: ..भूमिपुत्रांना अवसर येतो तेव्हा त्यांच्यात ‘राखणदार’ अवतरतो! चिंबलवासियांचा लढा आणि तोयार तळे

Damu Naik: 118 सभा, दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींवर स्‍पष्‍ट बहुमत; 'दामू नाईकां'च्‍या प्रदेशाध्‍यक्षपदाला एक वर्ष पूर्ण

SCROLL FOR NEXT