Court Canva
गोवा

Unity Mall Goa Controversy: 'पंचायत परवाना मिळेपर्यंत युनिटी मॉलचे काम नाही'! सरकारची न्‍यायालयाला हमी

Chimbel Unity Mall: पंचायतीकडून परवाना मिळाल्यावरच बांधकाम सुरू करण्यात येईल असे महाधिवक्ता देविदास पांगम त्यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे न्यायालयात स्‍पष्‍ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंबल येथे प्रस्तावित युनिटी मॉलचे बांधकाम सुरू केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीस आली असता, असे कुठलेच बांधकाम सुरू नसल्याचे सरकारने सांगितले.

पंचायतीकडून परवाना मिळाल्यावरच बांधकाम सुरू करण्यात येईल असे महाधिवक्ता देविदास पांगम त्यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे न्यायालयात स्‍पष्‍ट केले. याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, स्थानिक पंचायतीची परवानगी न घेता सरकारने प्रकल्पाचे कामकाज पुढे नेले आहे. मात्र, पांगम यांनी हे दावे पूर्णपणे चुकीचे असल्‍याचे स्पष्ट केले.

सदर जमिनीवर सध्या कोणतेही बांधकाम सुरू नसल्याचे न्यायालयाने नोंद केले आहे. तसेच याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. दरम्‍यान, काल रात्री घेतलेल्‍या विशेष बैठकीतही पंचायतीने युनिटी मॉलला परवाना न देण्‍याचा निर्णय घेतला होता.

‘त्‍या’ जागेवर सध्‍या फक्त कुंपण : सरकार

सदर जागेवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले नाही. फक्त कुंपण घालण्यात आले आहे. सरकारने चिंबल पंचायतीकडे बांधकाम परवानगीसाठी अर्ज आधीच दाखल केला आहे आणि परवाना मिळेपर्यंत कोणतेही बांधकाम सुरू करणार नाही, अशी हमी सरकारने न्यायालयात दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT