Toyaar Lake Goa Dainik Gomatnak
गोवा

Chimbel: ..अखेर सुरुवात झाली! 'तोयार' सभोवतीच्या जागेचे सर्वेक्षण सुरु; 3 दिवस चालणार काम

Chimbel Unity Mall: गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळ (जांटीडीसी), जलस्रोत खाते, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे (एनआयओ) अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकायनि हे सर्वेक्षण केले जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंबल पठारावरील तोयार तळ्याच्या सभोवतालच्या पाणथळ जागेच्या सर्वेक्षणास सकाळी सुरवात झाली. गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळ (जांटीडीसी), जलस्रोत खाते, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे (एनआयओ) अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकायनि हे सर्वेक्षण केले जात आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी २१ रोजी उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शुक्रवारी (काल) युनिटी मॉलच्या सर्वेक्षणास सुरवात झाली; परंतु ग्रामस्थांनी आणि उपोषणकर्त्याच्या वकिलांनी केवळ युनिटी मॉलच्या जागेचे सर्वेक्षण केले जाऊ नये, तर तोयार तळ्याभोवतालच्या पाणथळ जागेचे सर्वेक्षण केले जावे, गुगल मॅप आणि ड्रोनचा वापर करावा, अशी मागणी लावून घरली होती.

उपोषणकर्ते व ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने 'जीटीडीसी'चे सल्लागार प्रमोद बदामी यांना सर्वेक्षण एक दिवस पुढे ढकलावे लागले. सर्वेक्षणासाठी जीटीडीसी, जलस्त्रोत खाते, 'एनआयओ'चे अधिकारी युनिटी मॉलच्या ठिकाणी पोहोचले. त्याठिकाणाहून थेट त्यांनी तोयार तलाव गाठला. ग्रामस्थांच्या मदतीने तोयार तलावच्या सभोवतालच्या सर्वेक्षणास या खात्याच्या पथकाने सुरवात केली. तलावाची भिंत, प्रत्यक्षात पाण्याचा किनारा, सर्वात उंच जागा असा परिसर अशा पद्धतीने सर्वेक्षण सायंकाळपर्यंत सुरू होते.

दाट झाडीचा अडथळा !

तळ्याच्या भोवताली दाट झाडी असल्याने सर्वेक्षणाच्या कामात अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात तळ्याचा उंचवटा आणि पाणलोट क्षेत्रापर्यंतचे सर्वेक्षण करण्याचे काम किमान आणखी तीन दिवस चालणार आहे.

उत्तर-दक्षिण अशा असलेल्या तलावाच्या पश्चिमेकडून सर्वेक्षणास सुरवात झाली असून, त्याच बाजूने दाट झाडी असल्याने ते काम करताना या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tour Package: गोवा वाले बीच पे...! 'IRCTC' घेऊन आलीय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज, कसं करायचं बुकिंग? जाणून घ्या सर्व माहिती

Goan Sweet Dishes: 'कुछ मिठा हो जाए' म्हणलं की डोळ्यासमोर कॅडबरी न येता धोंडस, तवसळी, पायस, मणगणे यायला हवेत..

Abhishek Sharma: अभिषेक शर्मा बनणार नवा 'सिक्सर किंग'! 'हिटमॅन'चा मोठा विक्रम धोक्यात, फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

Goa Opinion: पंचायती राज! राजकीय सत्तेचे केंद्रीकरण की विकेंद्रीकरण?

Portuguese Goa History: 1895 साली दादा राणेंनी पोर्तुगीज सरकारविरुद्ध बंड पुकारलं; आफ्रिकेत पोहोचले गोव्यातले सच्चे मराठे सैनिक

SCROLL FOR NEXT