Chilli Business Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्याच्या व्यावसायिकाला 'मिरची' झोंबली! दुबईत निर्यातीच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक, पुण्यातील एकावर गुन्हा दाखल

Chilli Business Fraud: सांळुके यांनी नागराज यांना हिरव्या मिरच्यांना दुबई येथे मोठी मागणी आहे. त्यामुळे हिरव्या मिरच्यांना चांगला दर मिळत आहे. गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, अशी ग्वाही दिली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: मिरची व्यवसायामध्ये मोठा नफा मिळेल, अशी ग्वाही देऊन मोठी रक्कम गुंतविण्यास प्रवृत्त करून आपली फसवणूक केल्याची तक्रार झुआरीनगर येथील नागराज यांनी वेर्णा पोलिस स्थानकात केली आहे. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी पुणे येथील साळुंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागराज व पुणे येथील साळुंके हे दोघेही व्यावसायिक आहेत. त्यामुळे ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आले होते. सांळुके यांनी नागराज यांना हिरव्या मिरच्यांना दुबई येथे मोठी मागणी आहे. त्यामुळे हिरव्या मिरच्यांना चांगला दर मिळत आहे. हिरव्या मिरच्या निर्यात करण्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, अशी ग्वाही दिली होती.

साळुंके यांनी प्रवृत्त केल्याने नागराज यांनी २ सष्टेंबर २०२४ ते १९ सष्टेंबर २०२४ या दरम्यानच्या काळात दहा लाख साठ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर साळुंके यांनी नागराज यांच्या माहितीशिवाय व संमतीशिवाय बनावट सह्या करून व नागराजाचा शिक्का वापरून कागदपत्रे तयार केली.

त्या बनावट कागदपत्रांचा वापर करून हिरव्या मिरच्या दुबईला पाठविल्या. त्यानंतर साळुंके हे दुबईला गेले. तेथे गेल्यावर काही दिवसांनंतर त्यांनी नागराज यांच्याशी संपर्क साधला. दुबईत स्वस्त दरात मिरच्या विकल्याने नागराज यांचे सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT