Bicholim Garden  Dainik Gomantak
गोवा

Bicholim: बालोद्यान की जंगल? डिचोलीतील पार्कची दुरावस्था; साधनांची मोडतोड, अनैतिक धंद्यांना ऊत

Bicholim Childrens Park: एकेकाळी सदैव गजबजणारे शहरातील पहिलेवहिले ‘बालोद्यान’ मरणासन्न अवस्थेत असून, या बालोद्यानाला नवसंजीवनी कधी मिळणार, त्याची डिचोलीवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Childrens Park

डिचोली: एकेकाळी सदैव गजबजणारे शहरातील पहिलेवहिले ‘बालोद्यान’ मरणासन्न अवस्थेत असून, या बालोद्यानाला नवसंजीवनी कधी मिळणार, त्याची डिचोलीवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

वीस वर्षांपूर्वी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हिराबाई झांट्ये सभागृहासमोर मिनरल फाऊंडेशनच्या सौजन्याने हे बालोद्यान बांधण्यात आले आहे. २२ ऑगस्ट २००४ यादिवशी या बालोद्यानाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर दहा-बारा वर्षे या बालोद्यानात सदैव लहान मुलांचा किलबिलाट जाणवत होता. मात्र, या बालोद्यानाची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. सध्या तर या बालोद्यानाची स्मशानासारखी अवस्था झाली असून, ते उद्धाराच्या प्रतीक्षेत आहे.

या बालोद्यानाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या बालोद्यानाला झाडाझुडपांनी वेढले असून, ही झाडाझुडपे पाहून हे बालोद्यान की जंगल? असा प्रश्न पडत आहे. बालोद्यानाच्या प्रवेशद्वारावर जाताच आतील स्थितीची कल्पना येते. बालोद्यानात सापांचाही संचार असतो, अशी माहिती मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या बालोद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने या बालोद्यानाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.

साधनांची मोडतोड

या बालोद्यानातील लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले झोपळे, घसरगुंडी आदी साधनांची पूर्णपणे मोडतोड झालेली आहे. काही झोपळेही गायब आहेत. या बालोद्यानाच्या झालेल्या दुर्दशेमुळे गेल्या सात-आठ वर्षांपासून लहान मुलांसह विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांनीही या बालोद्यानाकडे पाठ हळूहळू पाठ फिरवली.

पालिकाही उदासीन

या बालोद्यानाला नवसंजीवनी देण्याची गरज आहे, तसेच पर्यटन खात्याकडून या बालोद्यानाचा विकास करण्याचा विचार सुरू असल्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी एका स्वयंसेवी क्लबच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. पालिकेकडूनही या बालोद्यानाच्या उद्धारासाठी विशेष पावले उचललेली नाहीत. या बालोद्यानाला नवसंजीवनी कधी मिळणार, त्याची प्रतीक्षा आहे.

अनैतिक धंद्यांना ऊत

बालोद्यानात विरंगुळ्यासाठी कोणीच येत नसल्याने आणि बालोद्यानाला झाडाझुडपांनी वेढल्याने अनैतिक धंदे करणाऱ्यांचे आयतेच फावत आहे. या बालोद्यानात बसून मद्यप्राशन करण्याचे प्रकारही घडत आहेत. बालोद्यानात अस्ताव्यस्त पडलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांवरून ते स्पष्ट होत आहे. प्रेमीयुगुलांकडून प्रेमाचे चाळेही या बालोद्यानात चालतात, अशी माहितीही मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT