Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Social Media Ban Goa: सोशल मीडिया वापरावर सरसकट बंदी अयोग्य! तवडकरांचे प्रतिपादन; अभ्यासावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त

Ramesh Tawadkar: धोरणात्मक विचार करून तोडगा काढणे योग्य ठरेल, असे मत क्रीडा तथा आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: १६ वर्षाखालील मुलांवर सोशल मीडिया वापरावर सरसकटपणे बंदी घालणे योग्य ठरणार नाही. मुलांचा अभ्यास व इतर गोष्टी देखील या माध्यमातून होतात. बंदी आणल्यास त्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. यावर धोरणात्मक विचार करून तोडगा काढणे योग्य ठरेल, असे मत क्रीडा तथा आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

तवडकर यांनी गुरूवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर आपली मते मांडली. अनुसूचित जमाती (एसटी) साठी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे प्रयत्न करीत आहे.

यासंदर्भात नवी दिल्लीत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संसदेत या आरक्षणाला मंजुरी मिळाली असली तरी काही तांत्रिक कारणास्तव अजून अधिसूचना काढण्यात आलेली नाही. पुढील ८ ते १५ दिवसांत यातील अडचणी दूर करून मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे तवडकर यांनी स्पष्ट केले.

आदिवासी भवनाचे काम पुढील दोन महिन्यांत

आदिवासी भवनासाठी पुढील पावले टाकली जातील. पुढील दोन महिन्यात कामाला सुरवात होईल.

कला अकादमीच्या इमारतीसंदर्भात मद्रास आयआयटी किंवा इतर कुणाकडून आलेला अहवाल आपण पाहिलेला नाही. तो मिळाल्यावर व वाचल्यावर आपण त्यावर भाष्य करू.

क्रीडा क्षेत्रातील साधन सुविधा तसेच मैदानांच्या देखरेखीसाठी क्रीडा खात्यातर्फे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च केले जातात. हा खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना निश्‍चित करण्याचा आपला विचार आहे.

पंचायत सचिवांना अधिकार जास्त दिल्यास चांगले व वाईट दोन्ही बाजू आहेत. सचिवांना अधिकार दिल्यास कामे पटकन होऊ शकेल. पण सर्वच सचिव चांगले असतात असेही नाही किंवा सरपंच, उपसरपंच चांगले असतात असेही नाही. सरकारने त्याबद्दल योग्य तो सल्ला घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे असे तवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT