Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: कपिल देऊलकरविरुद्ध लैंगिक शोषणप्रकरणी दोन आरोपपत्रे दाखल

सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या संशयित कपिल देऊलकर विरुद्ध बाल न्यायालयात दोन वेगवेगळी आरोपपत्रे दाखल झाली आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या संशयित कपिल देऊलकर याच्याविरुद्ध पणजी महिला पोलिसांनी बाल न्यायालयात दोन वेगवेगळी आरोपपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

महिला पोलिसांनी संशयित कपिल देऊलकर याच्याविरुद्ध चार विविध ठिकाणी प्रशिक्षण देत असलेल्या मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते.

तीन प्रकरणांत त्याच्याविरुद्ध, तर चौथ्या प्रकरणात त्याच्यासह संशयित राज च्यारी व इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. या सर्व गुन्ह्यांतील संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. हा गुन्हा गंभीर असल्याने संशयिताकडून जामिनासाठी अर्ज केलेला नाही.

न्यायालयात संशयित कपिल देऊलकर याच्याविरुद्ध 53 पानी आरोपपत्र दाखल असून त्यामध्ये डॉक्टर्स, चाईल्डलाईन (एनजीओ) पदाधिकारी, मुलांचे पालक तसेच तपास अधिकारी मिळून 13 साक्षीदार आहेत. दुसरे दाखल केलेले आरोपपत्र 48 पानी असून तेसुद्धा संशयित कपिल देऊलकर याच्याविरुद्ध आहे. त्यामध्येही 13 साक्षीदार आहेत.

अबकारी सुरक्षा रक्षकाला अटक

या लैंगिक शोषण प्रकरणातील चौथ्या गुन्ह्यामध्ये संशयित रामा सामंत व शशिकांत कांबळे या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. संशयित रामा सामंत हा अबकारी खात्यामध्ये सुरक्षारक्षक कामाला आहे. त्याच्या अटकेची माहिती खात्याला देण्यात आली आहे, अशी माहिती महिला पोलिस स्थानक अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT