Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Job Fraud: 24 लाख घेतले आणि फसवले! चिखलीतील पतीपत्नीवर गुन्हा दाखल; जहाजावर नोकरी देण्याचे दिले होते आमिष

Ship Job Scam Chikhali: दाम्पत्याने जुना फ्लॅट देण्याचे आश्वासन सुमारे पावणे सव्वीस लाख रुपये घेतल्याप्रकरणी गेल्या २४ डिसेंबरला नवे वाडे येथील एका व्यक्तीने वास्को पोलिस स्थानकात तक्रार केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: चिखली येथील रिचर्ड व राजेश्वरी या पतीपत्नीने जहाजावर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन २४ लाख ९४ हजार रुपये घेऊनही नोकरी न दिल्याप्रकरणी वाडे येथील एका व्यक्तीने वास्को पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. वास्को पोलिसांनी या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या दाम्पत्याने जुना फ्लॅट देण्याचे आश्वासन सुमारे पावणे सव्वीस लाख रुपये घेतल्याप्रकरणी गेल्या २४ डिसेंबरला नवे वाडे येथील एका व्यक्तीने वास्को पोलिस स्थानकात तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सदर दाम्पत्याने वाडे येथील एक व्यक्तीला एका जहाजावर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान २४ लाख ९४ हजार ६४९ रुपये घेतले होते.

त्यानंतर नोकरीही दिली नाही. तसेच घेतलेली रक्कम देण्याचेही टाळले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर व्यक्तीने वास्को पोलिस स्थानकात तक्रार केली. याप्रकरणी वास्को पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रिस्ली कार्वालो पुढील तपास करीत आहेत.

या पतीपत्नीने नवे वाडे येथील एका व्यक्तीला वापरात असलेला टू बीएचके फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊ २५ लाख ७४ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर सदर फ्लॅटही दिला नाही तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. सदर रक्कम डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ या दरम्यान घेतली होती. दोन्ही प्रकरणात वास्को पोलिस तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT