Margao Municipal Council Dainik Gomantak 
गोवा

Margao Municipal Council : मडगावचा मुख्याधिकारी पुन्हा बदलला; मान्युएल बार्रेटोंची नियुक्ती

रोहित कदम यांची बदली

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : मडगाव नगरपालिकेत नवीन मुख्याधिकारी म्हणून मान्युएल बार्रेटो यांची नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वी या पदावर असलेले रोहित कदम यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. सध्या नगरपालिकेत नगराध्यपदाची खुर्ची खाली असून आता मुख्याधिकारीही नसल्याने मडगाव नगरपालिकेत येणाऱ्या लोकांची कामे खोळंबून पडणार आहेत.

यापूर्वी असलेले मडगाव नगरपालिकेचे रोहित कदम यांची दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे, तर त्या पदावर कार्यरत असलेले मान्युएल बार्रेटो यांना मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदावर पाठविण्यात आले आहे, असा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

रोहित कदम यांची मुख्याधिकारीपदावर नेमणूक या वर्षाच्या मे महिन्यात करण्यात आली होती. केवळ पाच महिने त्यांनी या पदावर काम केले आहे. मागील काही वर्षांपासून मडगाव नगरपालिकेत स्थिर मुख्याधिकारी अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. कदम यांच्यापूर्वी असलेले आग्नेल फर्नांडिस यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदावर 19 महिने काम केले आहे. नंतर त्यांचीही बदली करण्यात आली होती.

दोन वर्षांत चार मुख्याधिकारी

मडगाव नगरपालिकेत दोन वर्षांच्या कार्यकाळात एकूण चार मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करून नंतर बदली करण्यात आली आहे. याबरोबरच गेल्या महिन्यात नगराध्यक्षपदावर विराजमान झालेल्या घनश्याम शिरोडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजूनपर्यंत नव्या नगराध्यक्षाची निवड करण्यात आली नाही.

याला आता 10 दिवस लोटले आहेत. अजूनही नव्या नगराध्यक्षपदाची नेमणूक झाली नसल्याने आणि मान्युएल बार्रेटो यांनीही आपल्या पदाचा ताबा घेतला नसल्याने काही दिवसासाठी मडगाव नगरपालिकेतील लोकांची कामे खोळंबून पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"त्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, म्हणून मी त्याला गोळ्या घातल्या'' मुलाच्या डोळ्यादेखत बापाची हत्या; आरोपीनं व्हिडिओ बनवून दिली गुन्ह्याची कबुली

Explainer: इस्रायल अन् अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला! युद्धाचा भडका का उडाला? जाणून घ्या वादाचं 'मेन' कारण VIDEO

Israel US Attack on Iran: मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला! भारतीय नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी; सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

"आई-बाबा मला माफ करा, तुमचे स्वप्न मी पूर्ण करु शकले नाही" पोलीस भरतीतील अपयशाच्या धक्क्यातून 26 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन

पाकड्यांचा गेम होणार? पल्लेकेलेत पावसाचे काळे ढग; 'वरुणराजा' पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवणार? जाणून घ्या Weather Report

SCROLL FOR NEXT