Cm Pramod Sawant Gomantak Digital Team
गोवा

CM Pramod Sawant: ‘सेवा’ने साजरा होणार मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस- तानावडे

भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे ः मोदींच्या शंभराव्या ‘मन की बात’चे 37 मतदारसंघांत आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पन्नासावा वाढदिवस २४ एप्रिल रोजी ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या पक्षाच्या ध्येयधोरणानुसार साजरा होईल.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 100 वा ‘मन की बात’ कार्यक्रम राज्यातील ३७ मतदारसंघात आयोजित केला जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाबू कवळेकर, दामू नाईक उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री आपला वाढदिवस लोकांमध्ये राहून साजरा करतील. त्यादिवशी ते सरकारी कार्यक्रमांतदेखील सहभागी होतील. साळगाव येथे ते राज्यातील सर्व पालिका आणि पंचायतींमधील नागरिक, कर्मचाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतील’, अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

याच कार्यक्रमात आधार-पॅन लिंक, दीनदयाळ सामाजिक योजना, किसान क्रेडिट कार्ड, यासारख्या योजनांच्या लाभार्थींना कार्डे वितरित करतील. याठिकाणी स्किल इंडिया अंतर्गत विविध कार्यक्रम होतील. अभिनव, एलएनटी आणि टाटा संस्थेबरोबर यावेळी सामंजस्य करार करण्यात येतील.

बूथस्तरावर सामाजिक संदेश : पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम राज्यातील 37 मतदारसंघात 100 टक्के बूथस्तरावर आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम राजकीय नसून तो सामाजिक संदेशाचा कार्यक्रम असतो. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी, 30 एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी सांगितले.

24 रोजी मुख्यमंत्र्यांचा दौरा

24 रोजी मुख्यमंत्री सकाळी 8.30 वा. लईराई देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर त्यांचे सातार्डेकर कुटुंबीयांकडे चहापान होईल. मग ते म्हापसा मिलाग्रीस चर्चमध्ये प्रार्थना करतील. 10 वाजता साळगाव येथे आयोजित सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवतील.

दुपारी 4 ते 7 या वेळेत ते पणजीतील पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारतील. तर संध्याकाळी 7 वा साखळी येथील राधाकृष्ण मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT