CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Industry: कुंकळ्ळी ‘औद्योगिक’ला मुख्यमंत्री भेट देणार

Goa Industry: युरी आलेमाव: आस्थापनांतील बेकायदा प्रकारांचा घेणार आढावा

दैनिक गोमन्तक

Goa Industry: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत वायू आणि जलप्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तसेच विविध औद्योगिक आस्थापनातील बेकायदेशीरता आणि अतिक्रमणांचा आढावा घेण्यासाठी शक्यता आहे.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीला भेट देण्याच्या दिलेल्या आश्वासनाचे मी स्वागत करतो, असे कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (इटीपी) उभारण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचे स्पष्टीकरण युरी आलेमाव यांना दिले.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये पडून असलेला घातक कचराही येत्या काही दिवसांत हलवण्यात येणार आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांना दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण आणि बेकायदेशीरतेचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता आणि मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन देण्याची मागणीही केली होती.

विधानसभेत वारंवार आवाज उठवून तसेच सरकार दरबारी तक्रारी करूनही सरकार कारवाई करत नाही. जर सरकारने आता कारवाई केली नाही तर कुंकळ्ळीमध्ये कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

सरकारने यापूर्वी घातक कचरा स्थलांतरित करण्यासाठी 5 कोटींची तरतूद जाहीर केली होती. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत बांधलेल्या बेकायदा शेडच्या विरोधात नोटीस बजावली होती. मात्र, प्रत्यक्ष कोणतीही कारवाई झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT