Lata Mangeshkar Dainik Gomantak
गोवा

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत मुंबईत होणार दाखल

गोवा राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. पूर्ण देश त्यांच्या निधनामुळे हळहळला आहे. आज रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील शिवाजीपार्क येथे त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक दिग्गज लोक मुंबईत दाखल होत आहेत. गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अंत्यसंस्कारासाठी मुंबईत दाखल होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत येणार आहेत. (Lata Mangeshkar Pramod Sawant News)

त्यांच्या निधनामुळे गोवा राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने देखील 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लतादिदींना कोरोनासोबतच (COVID-19) न्यूमोनियाची लागण झाली होती.

दरम्यान, गोवा भाजपाने देखील आपले पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. आज दि. 6 रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्याच्या (Goa) दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते भाजपाच्या जाहीरनाम्याचे अनावरण केले जाणार होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आभासी मार्गदर्शन सभा आयोजित केली होती. हे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे. तसेच पक्षाचे इतर राज्यस्तरीय कार्यक्रमही स्थगित केल्याचे यात म्हटले आहे. या कार्यक्रमांची पुढील तारीख नंतर कळवली जाईल, असे तानावडे यांनी सांगितले आहे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT