Saptakoteshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Saptakoteshwar Temple : श्री सप्तकोटीश्वर मंदिर लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री सावंत उपस्थित, श्रींचरणी अभिषेक सेवा केली अर्पण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या मंदिराचे तसेच तेथील पवित्र तळीचे लोकार्पण होणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

तुकाराम सावंत

भाविकांच्या साक्षीत आणि विविध धार्मिक विधीसह राजदैवत असलेल्या आणि छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला गुरुवारपासून अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देवस्थानला भेट दिलीय.

शिवकालीन इतिहास असलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सपत्नी श्रींवर अभिषेक केला. त्यांच्यासोबत पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही श्रींवर अभिषेक करून आपली सेवा अर्पण केली.

यावेळी आमदार प्रेमेंद्र शेटहेही उपस्थित होते. श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या नूतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री फळदेसाई यांनी सप्तकोटेश्वराचरणी आपली सेवा रुजू केली.

दरम्यान सध्या नार्वे गावात मंगल आणि भक्तीमय वातावरण पसरले आहे. आज शनिवारी मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी 9 वाजल्यापासून गोवा व महाराष्ट्रातील विविध किल्ले आणि अन्य स्थानातील पवित्र जलाने जलाभिषेक होणार आहे.

सायंकाळी 4 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल, प्ररातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या मंदिराचे तसेच तेथील पवित्र तळीचे लोकार्पण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

SCROLL FOR NEXT