Saptakoteshwar Temple : सप्तकोटीश्वर देवस्थानात मंगलमय वातावरण; भाविकांच्या गर्दीत शनिवारी लोकार्पण

भाविकांच्या साक्षीत आणि विविध धार्मिक विधीसह राजदैवत असलेल्या आणि छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला आजपासून (गुरुवारी) अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे.
Saptakoteshwar Temple
Saptakoteshwar Temple Dainik Gomantak
Published on
Updated on

भाविकांच्या साक्षीत आणि विविध धार्मिक विधीसह राजदैवत असलेल्या आणि छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या नार्वे येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला आजपासून (गुरुवारी) अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला आहे. या सोहळ्यानिमित्त नार्वे गावात मंगल आणि भक्तीमय वातावरण पसरले आहे. शनिवारी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यावेळी नार्वे गावात भक्तांचा महापूर लोटण्याची शक्यता आहे.

Saptakoteshwar Temple
Margao Municipality: 'मडगाव नगरपालिकेने स्वत:ला दिवाळखोर म्‍हणून घोषित करावे'

गुरुवारी सकाळी पुण्याहवाचन, मात्रुकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, देवतास्थापना, मुख्य देवता भवानी शंकर श्री सप्तकोटीश्वर महारुद्र देवता महापूजा, जीर्णोद्धार होम, बलिदान, पूर्णाहूती महाआरती आदी विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी महाप्रसाद झाला. सायंकाळी वेलकास-सावईवेरे येथील श्री लक्ष्मी भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम आणि घुमट आरती सादर करण्यात आली. नंतर नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. उद्या (शुक्रवारी) सकाळी विविध धार्मिक विधी दुपारी महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी देऊळवाडा-नार्वे येथील ग्रामस्थांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

शनिवारी लोकार्पण

शनिवारी (ता.11) मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी 9 वाजल्यापासून गोवा व महाराष्ट्रातील विविध किल्ले आणि अन्य स्थानातील पवित्र जलाने जलाभिषेक होणार आहे.

सायंकाळी 4 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल, प्ररातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, मचेचे आमदार प्रेमेंद्र शेट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या मंदिराचे तसेच तेथील पवित्र तळीचे लोकार्पण होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com