Goa Politician  Dainik Gomantak
गोवा

Goa Politician Scandal: सेक्स स्कँडल भोवणार; मंत्रीपद जाणार की राहणार?

मुख्यमंत्री करणार शहांशी चर्चा; भाजप संघटनेचे नेतेही सावधपणे परिस्थितीकडे लक्ष ठेवून

दैनिक गोमन्तक

CM sawant Meet Amit Shah On Goa Politician Sex Scandal: गोव्यात गाजत असलेल्या मंत्र्याच्या कथित सेक्स स्कँडलची वार्ता दिल्लीत पोचल्यानंतर प्रत्यक्ष भेटीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्या विषयावर चर्चा करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या मंत्र्यावर झालेला हा आरोप व त्याचे राजकीय क्षेत्रात उमटलेले पडसाद व प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेला विषय यामुळे सत्ताधारी पक्षाला त्याची त्वरित दखल घ्यावी लागली.

‘‘मुख्यमंत्री सावंत सध्या पश्‍चिम विभागीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी गुजरात येथे गेले असून तेथे गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर त्यांना या गंभीर वादासंदर्भात तोंड द्यावे लागेल,’’ अशी माहिती एका ज्येष्ठ भाजपा सूत्राने ‘गोमन्तक’ला दिली.

गोव्यातून प्रतिदिन गृहमंत्र्यांना राजकीय घडामोडींचा स्वतंत्रपणे अहवाल जात असतो, त्यामुळे यापूर्वीच या घटनेचा संपूर्ण तपशील केंद्रीयमंत्र्यांनी माहिती करून घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील एका ज्येष्ठ मंत्र्याचे एका महिलेबरोबर असलेले कथित लैंगिक संबंध ट्विटरद्वारे जाहीर केल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली.

चोडणकर यांनी यापूर्वी असाच आरोप विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या एका मंत्र्याविरोधात केला होता. त्यानंतर वीजमंत्री मिलिंद नाईक यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला व नाईक यांचा निवडणुकीतही पराभव झाला. त्यामुळे चोडणकर यांच्या आरोपांना राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

वास्तविक यावेळी चोडणकर यांनी कोणा मंत्र्याचे नाव घेतले नव्हते, परंतु त्यानंतर समाज माध्यमांवर गुदिन्हो यांच्या छायाचित्रांसह एका पंच महिला सदस्याची छायाचित्रे झळकली.

नंतर गुदिन्हो यांच्या समर्थक महिलांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेऊन या महिलेची नाहक बदनामी केली जात आहे, असा दावा केला व गुदिन्हो यांना पाठिंबा व्यक्त केला. या प्रकारामुळे गुदिन्हो यांचे नाव जगजाहीर झाले व भाजपा नेत्यांची कुचंबणा झाली.

या संपूर्ण प्रकाराबद्दल मुख्यमंत्री किंवा कोणीही जबाबदार पदाधिकाऱ्याने किंवा पक्ष प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराची निंदा केलेली नाही. तसेच गुदिन्हो यांना पाठिंबा देण्याचेही टाळले

मुख्यमंत्री प्रमोद सावंत गुजरात दौऱ्यावरून परतल्यानंतरच या प्रकरणावर राजकीय निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस चौकशी सुरू : सायबर विभागाचे साहाय्य

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयातून तसेच चिखलीच्या उपसरपंच ऐश्र्वर्या कोरगावकर यांनी वास्को पोलिसांत काल दाखल केलेल्या तक्रारींनंतर आज पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करून सायबर विभागातील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने तपास सुरू केला आहे.

एकूण आठ अधिकाऱ्यांचा या तपास पथकात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी सरकारातील एका मंत्र्याचा सेक्स स्कँडलमध्ये सहभाग आहे अशा आशयाचे ट्विट केल्यानंतर गुदिन्हो आणि कोरगावकर यांचे फोटो एकत्र करून समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता. त्यानंतर दोघांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

संबंध कोणीही कोणाशीही ठेवावे, पण आधी पदे सोडावी ः केरकर

कोणी फ्रेंड कॉलनी निर्माण केली. कोणाला बंगले बांधून दिले ते मला सांगायला लावू नका, असा इशारा तारा केरकर यांनी दिला आहे. त्या म्हणाल्या, आता हे प्रकरण सार्वत्रिक झाले असले तरी त्याची माहिती मला आधीपासूनच होती.

दोन सज्ञान व्यक्ती एकमेकांशी संबंध ठेवणे गुन्हा नाही असे काहीजण बोलत आहेत. असे माझे म्हणणे आहे. दोन्ही व्यक्ती सार्वजनिक जीवनातील पदांवर राहून आमच्या राज्याचे नाव बदनाम करू शकत नाहीत. ज्यांना खासगी जीवन उपभोगायचे असेल त्यांनी आधी पदे सोडली पाहिजेत.

‘आमच्यात गैरसमज नाहीत’

चिखलीच्या उपसरपंचाचे पती अमोल यांनी आपले व आपल्या पत्नीमध्ये कोणतेही गैरसमज नसल्याचे स्पष्ट केले. आपले अपहरण झाले व आपल्याला धमकावण्यात आले या प्रसारीत झालेल्या माहितीचा त्यांनी इन्कार केला.

मी माझ्या पत्नी आणि मंत्र्यासोबत आहे. काहीजणांनी हा विषय नको तेवढा वाढवला आहे. ती राजकारणात प्रगती करत असल्याने काहीजण तिच्यावर जळत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

या म्हणण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या हिने आपण उपसरपंच होण्यापूर्वी मंत्र्याच्या कार्यालयात काम करत होते व आताही करत आहे असे स्पष्ट करून तो मंत्री आपल्या कुटुंबाचाच घटक असल्यासारखा आम्हाला आहे असे स्पष्ट केले आहे.

केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन आपल्याबद्दल नाहक अफवा पसरवली जात आहे, असा दावा तिने केला आहे.

‘खाई त्याला खवखवे’

तारा केरकर म्हणाल्या, चुकीच्या गोष्टींचे कोणी समर्थन करू नये. कॉंग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी सरकारला हे प्रकरण खरे की खोटे अशी विचारणा केली होती. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते.

तरीही मंत्र्याच्या कार्यालयातून पोलिसात तक्रार होणे आणि महिला पंचाने पत्रकार परिषद घेणे याला ‘खाई त्याला खवखवे’ असे म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT