CM Pramod Swant Dainik gomantak
गोवा

Goa Host G20 Event: G20 मध्ये गोव्याला मिळणार संधी; मुख्यमंत्री म्हणाले...

G20 परिषदेच्या कार्यक्रम आयोजनाची गोव्याला संधी

दैनिक गोमन्तक

G20 शिखर परिषद 2023 भारतात होणार आहे. या शिखर परिषदेच्या कार्यक्रमाचे आयोजन गोव्यात करण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी गोव्याला संधी मिळणार असल्याचे म्हटले होते. त्याला आता केंद्राने सकारात्मकपणे घेतले असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी आज दिली. (Chief minister Pramod Sawant said Goa will host one of the events of the G20 summit)

G20 शिखर परिषद 2023 याबाबत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे भारतात होणाऱ्या या परिषदच्या काही कार्यक्रमांच्या आयोजनाची संधी गोव्याला मिळणार आहे. यापरिषदेवेळी सदस्य राज्यातील पर्यटनाशी संबंधित विषयावर चर्चा करतील ज्याचा गोवा राज्यावर सकारात्मक परिणाम होईल असे ही ते म्हणाले.

यापुर्वी 1983 साली चोगम (Commonwealth Heads of Government Meeting ) येथे झालेली परिषद तसेच 2016 मध्ये ब्रिक्स परिषदेनंतर दोन्ही ठिकाणांवर पर्यटकांची संख्या वाढली होती. या परिषदेचे काही कार्यक्रम आता गोव्यात होणार असल्याने गोवा राज्याच्या पर्यटक संख्येत वाढ होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की G20 चे अध्यक्षपद नुकतेच भारताने स्वीकारले आहे. त्यामुळे देशभरात या निमित्ताने अनेक बैठका होणार आहेत. G20 चे अध्यक्षपद भारताला मिळणे म्हणजे 'विश्वगुरू' बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. असा विश्वास ही मुख्यमंत्र्यानी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या विनंतीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा राज्याला संधी देण्यास सकारात्मकता दर्शवल्याबद्दल आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arun Gawli: गँगस्टर अरुण गवळीला दिलासा! शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

रानडुकरांसाठी लावलेल्या तारेचा शॉक लागला; गणपती घरी आले त्याच दिवशी सख्या भावांचा मृत्यू झाला Video

बाईक व्यवस्थित लावण्यास सांगितले म्हणून पे – पार्किंग कर्मचाऱ्यांवर 5 जणांकडून सुरी हल्ला, गणेश चतुर्थीला म्हापशात घडली घटना

Viral Video: दोन सांडांच्या भांडणात निष्पाप मुलीचा अपघात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “टार्गेट पूर्ण!”

Mohammed Shami: ‘मी क्रिकेट सोडून देईन!’… मोहम्मद शमी जेव्हा निवृत्ती घेणार होता, भरत अरुण यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT