Shashi Tharoor On Dr. Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले स्त्रीवादी पुरुष-थरुर

भारताने केलेली संगणक क्रांती जगाला दखल घेण्यास भाग पाडणारी
Shashi Tharoor
Shashi TharoorDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस खासदार शशी थरुर हे सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी गोवा हेरिटेज फेस्टिव्हल कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्त्रीवादी विचारसरणी यासह भारताची संगणक तंत्रज्ञानातील क्रांतीवर भाष्य केले. भारत हा गरीबांचा देश अशी स्थिती असताना भारताने केलेली संगणक क्रांती जगाला दखल घेण्यास भाग पाडणारी आहे ते म्हणाले. ( Shashi Tharoor Says Dr. BR Ambedkar Was India's First Male Feminist )

आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ''Ambedkar: A Life'' या पुस्काबद्दल त्यांनी चर्चा केली. यावेळी थरुर म्हणाले देशात एक वेळ अशी होती कि, स्त्रियांची बळजबरीने लग्न केली जात, त्यांना व्यक्ती म्हणून समाजात मान - सन्मान नसे, अशी स्थिती असताना महिलांच्या विवाहाचे वय, त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व, महिला कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेले भरीव काम लक्षात घेण्यासारखे आहे.

80-90 वर्षांपूर्वी एखादी व्यक्ती स्त्रीवादी विचारसरणीचे अनुकरण करत इतके प्रयत्न करते यावरुनच या माणसाची स्त्रीवादी विचारसरणी लक्षात येते तसेच मसुदा समितीचे अध्यक्ष असताना आंबेडकर यांनी विलक्षण घटनाकार म्हणून निभावलेली भुमिकेला तोड नाही असे थरुर म्हणाले.

जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा काय? या प्रश्नाला उत्तर देताना थरूर म्हणाले की 1975 या काळात भारत हा एक गरीब देश मानला जात होता. आणि भारताबद्दल लोकांची कल्पना खिळ्यांवर झोपलेल्या फकीराची होती तिथून ते आज पर्यंतचे भारताची सॉफ्टवेअर क्षेत्रातील क्रांती हा प्रवास जगाला दखल घेण्यास भाग पाडणारा आहे. असे ही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com