Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: राज्याच्या विकासाला मिळणार गती; 943 कोटींच्या कामांचे DPR केंद्र सरकारला सादर

मुख्यमंत्र्यांची माहिती; सर्व कामांना मंजुरी मिळण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारच्या योजनांबाबत सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत 943 कोटी रूपयांच्या कामांचे डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. एकूण 70 डीपीआर पैकी 42 कामांचे डीपीआर केंद्राला सादर करण्यात आले आहेत. त्याची एकूण किंमत 943 कोटी रूपये आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या डीपीआरबाबत बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, केंद्राच्या अधिकाधिक योजनांचा लाभ राज्याला मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. केंद्राच्या विविध योजनांसह सामाजिक योजनांच्या कामांचा आढावा घेतला. आत्तापर्यंत जवळपास एकूण 70 डीपीआर तयार केले आहेत.

त्यापैकी 42 कामांचे डीपीआर केंद्राला मंजुरीसाठी पाठवले आहेत. ते मंजूर होतील, याची खात्री आहे. राज्याच्या विकासाला यातून गती मिळणार आहे, उर्वरीत डीपीआर देखील अंतिम तपासणीनंतर मंजुरीसाठी पाठवले जातील. रोजच्या रोज जी कामे केली जात आहेत, त्याची अंमलबजावणी कशी केली जात आहे, त्याचा आढावा घेतला जात आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पुर्तीनिमित्त राज्याला अधिकाधिक निधी कसा मिळेल, हॅलो गोयंकार कार्यक्रम कसा सुरू आहे, अधिवेशनाची तयारी कशी सुरू आहे, याची माहिती घेतली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT