Goa Bypoll Result: धर्मापूर-शिर्लीमध्ये केवळ एका मताने विजय; पंचायतींच्या 3 प्रभागांतील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

पार्से, धर्मापूर-शिर्ली, सांत इस्तेव या प्रभागांमध्ये झाले होते मतदान
Goa Bypoll Result 2023
Goa Bypoll Result 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Village Panchyat Bypoll Result: गोव्यातील तीन तालुक्यांमधील तीन पंचायतींमधील तीन प्रभागांमध्ये रविवारी पोटनिवडणूक झाली होती. या तिन्ही पंचायतींसाठी मिळून 72.50 टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, आज, सोमवारी या तिन्ही पोटनिवडणुकींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये धर्मापूर-शिर्ली येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये मिंगेलिना कार्व्हालो यांनी केवळ एका मताने विजय मिळवला आहे.

Goa Bypoll Result 2023
Tree Uprooted in Aldona: हळदोण्यात कार अन् वीजांवर कोसळले झाड; 5 लाखांचे नुकसान
Goa VP Bypoll Result
Goa VP Bypoll ResultDainik Gomantak

यामध्ये पेडणे तालुक्यातील पार्से पंचायतीच्या प्रभाग 7 मध्ये 85.16 टक्के मतदान झाले होते. या प्रभागात अजित सगुन मोरजकर हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 178 मते पडली. त्यांची मतांची टक्केवारी 35.25 इतकी आहे. या प्रभागात खुले आरक्षण होते.

या प्रभागात अमर चंद्रोजी यांना 103 (20.40 टक्के), अर्जून चंद्रोजी यांना 113 (22.38 टक्के), प्रदीप भिकाजी पोळजी 110 (21.78 टक्के) मते मिळाली.

सासष्टी तालुक्यातील धर्मापूर-शिर्ली पंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये 60.91 टक्के मतदान झाले होते. येथून मिंगेलिना कार्व्हालो या विजयी झाल्या आहेत. हा प्रभागही खुला होता. कार्व्हालो यांना 179 (49.31 टक्के) मते पडली. तर मारिया सांताना रॉड्रिग्ज सिक्वेरा यांना 178 (49.04) मते पडली. कार्व्हालो या केवळ एका मताने विजयी झाल्या.

तिसवाडी तालुक्यातील सांत इस्तेव पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये ओबीसी आरक्षण होते. येथे 71.31 टक्के मतदान झाले होते. येथे हेमंत गुरूदास शेट यांनी विजय मिळवला. त्यांना 206 (57.54 टक्के) मते पडली. अमरिश शेट यांना 109 (30.45 टक्के), तर रामानंद चोडणकर यांना 38 (10.61 टक्के) मते मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com