Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: खाणपट्ट्यांच्या लिलावाबाबत मुख्यमंत्री ठाम

राज्यातील खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यासंदर्भात गोवा सरकार ठाम

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील खाणपट्ट्यांचा (Goa Mining) लिलाव करण्यासंदर्भात सरकार (Goa Government) ठाम आहे. या खाणी लवकर सुरू व्हाव्यात यासाठी सरकारने सर्व स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. खनिज महामंडळ स्थापन केले असून त्यासंदर्भातच्या कामकाज नियमांचा मसुदाही कायदा खात्याकडे पुढील निर्णयासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे खाणपट्ट्यांचा लिलाव करण्याचा निर्णय झाला आहे, असे ठोसपणे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) म्हणाले.

पर्वरी येथील मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, गोवा मुक्तिदिनाच्या 60 वर्षानिमित्तच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे हे निश्‍चित झाले आहे. मात्र, त्यांच्या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती लवकरच पंतप्रधान कार्यालयातून पाठविली जाणार आहे. एक दिवसाच्या दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पणजीतील आझाद मैदानावरील स्मारकाला श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर त्यांना युथ हॉस्टेल येथे नौदल, हवाईदल व पायदल यांच्यातर्फे परेड तसेच मानवंदना देण्यात येईल. दुपारी 3.30 वा. ते ताळगाव पठार येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिएममध्ये आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असून यामध्ये विविध क्षेत्रात कोविड काळात व ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्व गोवा’ या संकल्पनेखाली विशेष काम केलेल्यांचा सत्कार व गौरव केला जाणार आहे अशी माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्यात कोरोना संसर्गानंतर ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याची माहिती पसरवली जात आहे मात्र त्यासंदर्भात घाबरण्यासारखे काही नाही. परदेशातून आलेल्या जहाजावरील कर्मचारी कोरोनाबाधित सापडले आहेत त्यांचे नमुने जनोम चाचणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे.

गृहकर्ज योजनेस पाच बँकांची निवड

सरकारी कर्मचाऱ्यांना गृह कर्ज योजनेखाली कर्जासाठी सरकारने पाच बँकांची निवड केली आहे. त्यामध्ये गोवा राज्य सहकारी बँकेसह इतर 4 राष्ट्रीयीकृत बँकांचा समावेश आहे. या कर्जासाठी 6.5 टक्के व्याज कर्जापोटी बँकांकडून आकारले जाईल. त्यापैकी 2 टक्के व्याज कर्मचारी फेडणार आहेत तर उर्वरित 4.5 टक्के व्याज सरकार सोसणार आहे. ईडीसीकडून या कर्जाची सोय ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT