53rdEditionOfIffiGoa Dainik Gomantak
गोवा

53rdEditionOfIffiGoa: जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष लागलेल्या IFFI साठी गोवा सज्ज

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली आढावा बैठक

दैनिक गोमन्तक

देशासह जगभरातील सिनेरसिकांचे ज्या महोत्सवाकडे लक्ष लागलेले असते असा भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’ 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत गोवा येथे पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज आढावा बैठक घेतली.

(Chief Minister Pramod Sawant held a review meeting for International Film Festival of India 53 3)

मिळालेल्या माहितीनुसार 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2022 या कालावधीत गोव्यात 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) पार पडणार आहे. या महोत्सवामध्ये जय भीम, मेजर, अरीयप्पू, द काश्मीर फाइल्स आणि आरआरआर या चित्रपटांचा समावेश असणार आहे.

या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 25 फिचर तर 20 नॉन-फिचर चित्रपटांचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं आहे. 354 चित्रपटांमधून फक्त 25 फिचर चित्रपटांची निवड या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. त्यामूळे सिनेरसिक याची आतूरतेने वाट पाहत आहेत.

याबाबत आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये गोवा पोलिसांची महोत्सवादरम्यान आवश्यक भुमिका, वाहतूक व्यवस्थेची नियामवली, तसेच महोत्सवासाठी संबंधित सर्व विभागांना कामे पूर्ण करण्यासाठी मुदत निश्चित केली असल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या महोत्सवासाठी 5 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तसेच हिंदीसह इतर भाषांमधील बऱ्याच चित्रपटांचा इफ्फीमध्ये समावेश असणार आहे

जगभरातील सिनेरसिकांसाठी IFFI महत्त्वाचा का?

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मानला जातो. याचे आयोजन गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT